Animal: 'माझ्या भूमिकेला जास्त स्क्रिन टाइम हवा होता, पण..'; बॉबी देओलची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 12:16 PM2023-12-04T12:16:42+5:302023-12-04T12:18:43+5:30

Bobby deol: बॉबी देओलने पहिल्यांदाच या सिनेमातील भूमिकेविषयी भाष्य केलं आहे.

bobby-deol-breaks-silence-on-his-limited-screen-time-in-animal-i-wish-i-had-more-scenes-but-i-am-happy-with-it | Animal: 'माझ्या भूमिकेला जास्त स्क्रिन टाइम हवा होता, पण..'; बॉबी देओलची पहिली प्रतिक्रिया

Animal: 'माझ्या भूमिकेला जास्त स्क्रिन टाइम हवा होता, पण..'; बॉबी देओलची पहिली प्रतिक्रिया

रणबीर कपूर (ranbir kapoor) आणि रश्मिका मंदाना (rashmika Mandanna) यांची मुख्य भूमिका असलेला 'एनिमल' (animal) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट होतोय. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या क्राइम ड्रामा फिल्मने पहिल्याच दिवसापासून बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरु केली आहे. त्यामुळे सिनेमातील प्रत्येक सीन, डायलॉग्स आणि खासकरुन कलाकारांचा अभिनय याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होतीये. विशेष म्हणजे या सिनेमा अभिनेता बॉबी देओल (bobby deol) खासकरुन लक्षवेधी ठरत आहे. एकही संवाद नसतानाही त्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. या भूमिकेविषयी नुकतंच त्याने भाष्य केलं आहे.

'एनिमल' या सिनेमात रणबीरने रणविजय सिंह ही भूमिका साकारली आहे. तर, अनिल कपूरने बलबीर सिंह ही भूमिका वठवली आहे. या सिनेमा बॉबीने खलनायकाच्या रुपात झळकला असून नुकतंच त्याने या भूमिकेविषयी त्याचं मत मांडलं आहे.

"मी साकारलेली भूमिका फार मोठी नव्हती पण ती अशी भूमिका होती ज्यात खूप काही दडलं होतं. खर तर माझ्या या रोलसाठी थोडा जास्त स्क्रिन टाइम मिळावा अशी इच्छा होती. पण, ज्यावेळी मी हा सिनेमा साइन केला त्यावेळीच मला भूमिकेची लांबी किती असेल हे सांगितलं होतं. मात्र, मी त्यावेळी अशा परिस्थितीत होतो ज्यावेळी देवाने मला मार्ग दाखवला. त्यामुळे मी देवाचा आभारी आहे", असं बॉबी देओल म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "संदीप रेड्डी वांगा यांनी मला ही भूमिका साकारायची संधी दिली. मला माहितीये की माझं काम फक्त १५ दिवसांचं होतं. आणि मी संपूर्ण सिनेमात दिसणार नाहीये. पण, लोकांचं माझ्याकडे लक्ष जाईल याची मला खात्री होती. मात्र, लोकांकडून मला खूप प्रेम, कौतुकाची थाप मिळाली."

दरम्यान,  संदिप रेड्डी वांगा दिग्दर्शित एनिमल हा सिनेमा १ डिसेंबर २०२३  रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर आणि बॉबी देओल महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत. हा सिनेमा हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत रिलीज झाला आहे. या सिनेमाने अवघ्या तीन दिवसात 202.57 कोटींची कमाई केली आहे.

Web Title: bobby-deol-breaks-silence-on-his-limited-screen-time-in-animal-i-wish-i-had-more-scenes-but-i-am-happy-with-it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.