​पहिल्या‘गे’ पतीला सोडून मंदना करिमी झाली मंदना गुप्ता!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 13:03 IST2017-01-27T05:47:10+5:302017-01-27T13:03:06+5:30

‘बिग बॉस’ची माजी स्पर्धक मंदना करिमी आठवतेय? होय, तिच ती हॉट अ‍ॅण्ड ग्लॅमरस मॉडेल. मंदना करिमी गेल्या काही दिवसांपासून लग्नासाठी प्रचंड उतावीळ झाली होती. अखेर मंदना बॉयफ्रेन्ड संजय गुप्ता याच्यासोबत लग्नाच्या बेडीत अडकली.

Blindness Karamini leaves the husband's first and goes 'Mandna Gupta !!' | ​पहिल्या‘गे’ पतीला सोडून मंदना करिमी झाली मंदना गुप्ता!!

​पहिल्या‘गे’ पतीला सोडून मंदना करिमी झाली मंदना गुप्ता!!

 
बिग बॉस’ची माजी स्पर्धक मंदना करिमी आठवतेय? होय, तिच ती हॉट अ‍ॅण्ड ग्लॅमरस मॉडेल. मंदना करिमी गेल्या काही दिवसांपासून लग्नासाठी प्रचंड उतावीळ झाली होती. अखेर मंदना बॉयफ्रेन्ड गौरव गुप्ता याच्यासोबत लग्नाच्या बेडीत अडकली. इन्स्टाग्रामवरून मंदनाने ही बातमी जाहिर केली आहे. म्हणजेच मंदना करिमीची आता मंदना गुप्ता झालीय.
 


ALSO READ : ​मंदना करिमी इतकी का झाली लग्नासाठी उतावीळ?

मंदनाचा हा दुसरा विवाह आहे,हे कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. मीडियातील बातम्या खºया मानाल तर,२०११ मध्ये मंदनाने ललित तेहलान याच्याशी सीक्रेट मॅरेज केले होते. मात्र या लग्नानंतर ललित हा गे असल्याचे मंदनाला कळले आणि तिने त्याला सोडचिठ्ठी दिली. ललित आणि फॅशन डिझाईनर रोहित बल हे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. ललित आणि रोहित या दोघांना अनेक प्रसंगी इंटिमेट होतांना पाहिले गेले आहे. २०११ मध्ये ललित व रोहित या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. यानंतर १८ फेबु्रवारी २०११ रोीजी ललितने आर्य समाज मंदिरात मंदनाशी लग्न केले होते. मंदनाने केवळ भारतीय नागरिकत्वासाठी ललितसोबत लग्न केल्याची चर्चाही त्यावेळी रंगली होती.
१९ मार्च १९८८ रोजी तेहरान(इराण)मध्ये जन्मलेल्या मंदनाने एअरहोस्टेस म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर ती मॉडेलिंगकडे वळली. ‘भाग जॉनी’मधून तिने बॉलिवूड डेब्यू केले होते. अनेक चित्रपटांत आयटम साँग आणि लहान-मोठ्या भूमिका केल्यानंतर मंदना गतवर्षी आलेल्या ‘क्या कुल है हम3’मध्ये पहिल्यांदा फीमेल लीड रोलमध्ये दिसली होती. यानंतर मंदनाचे करिअर मार्गी लागेल, असे मानले जात असताना अचानक करिअला करकचून ब्रेक लावत मंदनाने लग्नाचा निर्णय घेतला. ही मोठी रिस्क होती. पण मंदना तिच्या लग्नाच्या निर्णयावर ठाम होती.मला अनेकांनी लग्नाचा निर्णय ही तूर्तास मोठी रिस्क ठरेल, असे सांगितलेयं. पण माझ्यामते, लग्नासाठी ही अगदी योग्य वेळ आहे. करिअरसाठी मी माझे कौटुंबिक आयुष्य पणाला लावू शकत नाही. शेवटी कुटुंबासोबतच यशाचा आनंद साजरा करण्यात खरी मजा आहे, असे ती म्हणाली होती.

Web Title: Blindness Karamini leaves the husband's first and goes 'Mandna Gupta !!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.