​भाजपा नेत्याने अप्रत्यक्षपणे साधला शाहरुख खानवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2017 17:33 IST2017-01-22T12:03:03+5:302017-01-22T17:33:03+5:30

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या आगामी रईस या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान अडचणी कमी होण्याचे नावच घेत नसल्याचे दिसते आहे. छत्तीसगढ येथील ...

The BJP leader indirectly conducted Shah Rukh Khan on the Nisha | ​भाजपा नेत्याने अप्रत्यक्षपणे साधला शाहरुख खानवर निशाणा

​भाजपा नेत्याने अप्रत्यक्षपणे साधला शाहरुख खानवर निशाणा

लिवूडचा किंग शाहरुख खानच्या आगामी रईस या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान अडचणी कमी होण्याचे नावच घेत नसल्याचे दिसते आहे. छत्तीसगढ येथील चित्रपटगृह मालकाला रईसचे प्रदर्शन करू नका अशा धमकीच्या आशयाचे पत्र मिळाल्यावर मध्यप्रदेशातील भाजपा नेते कैलास विजयवर्गीय यांनी शाहरुख खानवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत ‘रईस’ हा चित्रपट पाहू नका असे आवाहन केले आहे. 

भारतीय जनता पार्टीचे महासचिव कैलास विजवर्गीय यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहलेय म्हटलेय, जो ‘रईस’ या देशाचा नाही तो कोणत्याच कामाचा नाही आणि एका ‘काबिल’ देशभक्ताची साथ सर्वांनीच द्यायला हवी. (‘जो ‘रईस’ देश का नही वो किसी काम का नही और एक काबिल देशभक्त का साथ तो हम सभी को देना ही चाहिये’) या पोस्टसह विजयवर्गीय यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ‘‘आता वेळ देशातील ‘काबिल’ जनतेची आहे. जो देशाच्या ‘काबिल’ आहे त्याचा अधिकार कोणीच बेइमान ‘रईस’ हिसकावून घेऊ शकत नाही. (प्रधानमंत्री मोदी जी ने नोट बंदी कर, काले धन वाले ‘रइसो’ को जमीन पर ला दिया। अब बारी देश की ‘काबिल’ जनता की है जो ‘‘काबिल’’ है, उसका हक कोई बेईमान ‘रर्ईस’ न छिन पाये।) Read More : रईसची विघ्ने संपेनात! शाहरुख संकटात




या संपूर्ण पोस्टमध्ये शाहरुख खानचा उल्लेख त्यांनी टाळला आहे. मात्र रईस व काबिल या दोन या शब्दावर त्यांनी भर दिला आहे. शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला ‘रईस’ हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. यासोबत हृतिक रोशनचा ‘काबिल’ हा चित्रपटही याच दिवशी प्रदर्शित केला जाणार आहे. शाहरुखवर निशाणा साधण्याची ही विजयवर्गीय यांची ही पहिली वेळ नाही. याआधी त्यांनी ट्विटरहून शाहरुख खान हा भारतात राहतो पण त्याचे मन पाकिस्तानशी जुळलेले आहे असे ट्वीट केले होते. यावर वाद झाल्याने नंतर त्यांनी ते काढून टाकले होते. कैलास विजयवर्गीय यांच्या या पोस्टवर नकारार्थी व धर्माचे राजकारण करू नका असे कमेंट आले आहेत. Read More : छत्तीसगढच्या वितरकाला मिळाले ‘रईस’च्या प्रदर्शनाचा विरोध करणारे शिवसेनेचे पत्र

ALSO READ : 
‘रईस’चे प्रमोशन माहिरा खान करणार ; पण ‘स्काईप’ वरून?
READ : शाहरूख खानबद्दल काय बोलले राकेश रोशन?

Web Title: The BJP leader indirectly conducted Shah Rukh Khan on the Nisha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.