​BIRTHDAY SPECIAL : ‘जानेमन गर्ल’ परिणीती चोप्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 09:41 IST2016-10-22T09:41:45+5:302016-10-22T09:41:45+5:30

हरियाणामध्ये पंजाबी कुटुंबात जन्मलेली कुडी परिणीती चोप्रा हिने २०११ मध्ये ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. ...

BIRTHDAY SPECIAL: 'Sweetheart Girl' Parineeti Chopra | ​BIRTHDAY SPECIAL : ‘जानेमन गर्ल’ परिणीती चोप्रा

​BIRTHDAY SPECIAL : ‘जानेमन गर्ल’ परिणीती चोप्रा

ियाणामध्ये पंजाबी कुटुंबात जन्मलेली कुडी परिणीती चोप्रा हिने २०११ मध्ये ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. तिचा बबली लूक, अ‍ॅक्टिंग स्कील्स, बिनधास्त अ‍ॅटीट्यूड यामुळे चाहत्यांच्या मनावर ती राज्य करतेय.

‘इन्व्हेस्टमेंट बँकर’ म्हणून तिला करिअर करायचे होते, पण नशीबाची साथ मिळाली अन् बॉलिवूडच्या झगमगाटामध्ये तिने पाय रोवले. तिचा अभिनय आणि नुकताच तिने केलेला ‘वेटलॉस’ यामुळे ती पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आलीय. ‘ढिशूम’ चित्रपटातील ‘जानेमन आह’ या गाण्यातील तिच्या बोल्ड आणि हॉट अंदाजाला चाहत्यांनी कौतुकाची थाप दिली.

अशा बॉलिवूडच्या ‘जानेमन गर्ल’ परिणीतीचा आज बर्थडे. तिला यापुढील यशस्वी कारकीदीर्साठी ‘सीएनएक्स मस्ती’ टीमकडून हार्दिक शुभेच्छा...!

परिणीतीची खवय्येगिरी :

लहानपणापासूनच परिणीतीला खाण्याची जबरदस्त आवड होती. पिझ्झा म्हणजे तिचा जीव की प्राण. कुठलाही खाद्यपदार्थ समोर आला की, त्याची चव चाखल्याशिवाय तिला राहवत नसे. व्यायाम करणं निरोगी शरीरासाठी महत्त्वाचं असतं हे माहीत असूनही, व्यायामाचा तिला प्रचंड कंटाळा होता.



परिणामी, तिला तिचे ड्रेसही व्यवस्थित यायचे नाहीत. स्लिव्हलेस ड्रेस घालू शकत नाही याचं शल्य तिला बोचत होतं. त्यामुळे ती जाम वैतागली होती. सर्वसामान्य तरूणींप्रमाणेच परिणीतीलाही वयाच्या २५ व्या वर्षी वाटायचं की, आपण ‘फिट अ‍ॅण्ड फाईन’ असावं.

‘फॅट’ असण्याच्या मानसिकतेतून जाताना तिच्यासाठी बॉलिवूडची द्वारे खुली झाली. ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’च्या निमित्ताने इंडस्ट्रीला बेधडक परिणीतीची ओळख झाली.

‘फॅट टू फिट’ प्रवास :

बॉलिवूडमध्ये बबली गर्लने एन्ट्री करताच तिला स्थूल वजनाचा मुद्दा स्वस्थ बसू देईना. तिच्या बिनधास्त स्वभावानुसार तिने सोशल मीडियावर स्थूल असल्याचेही कबूल केले. ‘ईशकजादे’, ‘शुद्ध देसी रोमान्स’ ,‘हसी तो फसीं’, ‘दावत-ए-ईश्क’ या चित्रपटांपर्यंत तिचं वजन ८६ किलो होतं.

यानंतर तिला मिळणाऱ्या प्रोजेक्टची संख्या रोडावत गेली. मग तिला कळून चुकले की, ‘बॉलिवूड म्हणजे गुड लुक्स, फिगर आणि अ‍ॅक्टिंग स्कील्स यांचं अनोखं समीकरण आहे. हे सर्व गुण नसतील तर इंडस्ट्रीत झिरो डिमांड असेल. निराश न होता मग तिने स्वत:ला फिट बनवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न सुरू केले.



वर्क आऊट सेशन :

परिणीतीला वजन घटवण्यासाठी रेग्युलर जीममध्ये जाणं आवडत नसायचं. म्हणून ती केरळ मार्शल आर्टस म्हणजेच ‘कलरीपट्टू ’ शिकली. ती दररोज एक तास हा व्यायामप्रकार करायची. यामुळे तिला लवचिक, एनर्जीटिक, स्ट्राँग फिलिंग येत असायचं. त्यानंतर तिनं वजन कमी करण्यासाठी एका एक्सरसाईज प्रोग्रामसाठी तब्बल १० लाख रुपए खर्च केले. या प्रोग्राममध्ये काही टेस्टमधून जावे लागते.

सहा महिन्यांसाठी एक डाएट चार्ट ठरवून देण्यात येतो. ३० दिवसांसाठी हा ट्रेनिंग प्रोगाम असतो. परीने न कंटाळता हा ट्रेनिंग प्रोग्राम पूर्ण केला. ती म्हणते, खरंतर आरसा हाच माझा पहिला गुरू आहे. त्यामुळेच मला माझ्या स्थूलतेची जाणीव झाली. तिच्या वर्कआऊट प्रोग्राममध्ये जॉगिंग, मेडिटेशन, योगा, स्विमिंग, घोडेस्वारी, रनिंग, डान्स मुव्हज्, कार्डिओ आणि रेग्युलर व्यायाम हे प्रकार होते. 



डाएट प्लान :

वजन घटवायचे म्हटल्यास केवळ व्यायाम गरजेचा नसून, त्यासोबत आहाराचे योग्य नियोजनही आवश्यक असते. तिच्या ब्रेकफास्टमध्ये दूध, ब्रेड-बटर, अंडी, ज्यूस यांचा समावेश असतो. लंचमध्ये ती डाळ आणि रोटी, ब्राऊन राईस, सलाड आणि हिरव्या पालेभाज्या खात असे. डिनरमध्ये तेलकट नसलेले साधे खाद्यपदार्थ, एक ग्लास दूध किंवा कधीतरी चॉकलेट शेक असतो.

Web Title: BIRTHDAY SPECIAL: 'Sweetheart Girl' Parineeti Chopra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.