​Birthday Special : संजय दत्तच्या आयुष्याशी निगडित ‘हे’ रहस्य कदाचित आपणास माहित नसेल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 13:27 IST2017-07-29T07:57:58+5:302017-07-29T13:27:58+5:30

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याचा आज वाढदिवस आहे. सिनेसृष्टीत ‘खलनायक’ पासून ‘मुन्ना भाई एमबीबीएस’पर्यंत संजय दत्तने करोडो फॅन्सच्या मनावर ...

Birthday Special: 'This' secret associated with Sanjay Dutt's life may not have been known to you! | ​Birthday Special : संजय दत्तच्या आयुष्याशी निगडित ‘हे’ रहस्य कदाचित आपणास माहित नसेल !

​Birthday Special : संजय दत्तच्या आयुष्याशी निगडित ‘हे’ रहस्य कदाचित आपणास माहित नसेल !

लिवूड अभिनेता संजय दत्त याचा आज वाढदिवस आहे. सिनेसृष्टीत ‘खलनायक’ पासून ‘मुन्ना भाई एमबीबीएस’पर्यंत संजय दत्तने करोडो फॅन्सच्या मनावर राज्य केले आहे. विशेष म्हणजे संजय दत्तचे रियल लाइफ एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. २९ जुलै १९५९ रोजी सुनील दत्त आणि नर्गिसच्या घरात जन्मलेल्या संजय दत्तने बॉलिवूडचे बरोबरच स्वत:चेही नाव कमविले, मात्र त्यांच्या आयुष्यात घडलेले वाददेखील विसरण्यासारखे नाहीत.  

Image result for sanjay-dutt

संजय दत्त हा लहानपणपासूनच सर्व कुटुंबात लाडका होता. त्याचे शिक्षण कसौलीच्या जवळ लॉरेन्स स्कूल, सनावरमध्ये झाले होते. घरात फिल्मी वातावरण असल्याने संजय दत्त आपल्या आई-वडिलांसोबत नेहमी शूटिंग पाहायला जायायचा. याच कारणाने त्याची चित्रपटांकडे ओढ निर्माण झाली होती आणि अभिनेता बनण्याचे स्वप्न पाहू लागला. आई-वडील चित्रपटाशी जुडलेले होते म्हणून संजू बाबाला अ‍ॅक्टिंगचे धडे घरातूनच मिळाले होते. 

संजय दत्तच्या आयुष्यातील एक सत्य म्हणजे, त्याने आर्म्स अ‍ॅक्टच्या प्रकरणात सुमारे ४२ महिन्यांपर्यंत जेलमध्ये शिक्षा भोगल्यानंतर २५ फेब्रुवारी २०१६ रोजी पुण्याच्या येरवडा जेलमधून सुटका झाली आहे. 

* फिल्मी करिअर   
संजय दत्तने बाल कलाकाराच्या रुपात आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात आपल्याच आई-वडिलांच्या बॅनरचा ‘रेशमा और शेरा’या चित्रपटातून केली होती. तसेच मुख्य अभिनेता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात १९८१ मध्ये ‘रॉकी’ चित्रपटातून केली. विशेष म्हणजे संजू बाबाचा हा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला आणि सर्वांनाच चकित केले होते. मात्र दुर्दैवाने चित्रपट रिलीज होण्याअगोदरच त्याची आई नर्गिसचे निधन झाले. शिवाय मध्यंतरीच संजू बाबाला ड्रग्स घेण्याची सवय लागली होती. याच कारणाने त्याच्या हातातून कित्येच चित्रपट निसटले. शेवटी सुनील दत्तने संजय दत्तला अमेरिकामध्ये नशामुक्ती केंद्रात उपचारासाठी पाठविले.

मुंबई मधील बॉम्ब स्पोटादरम्यान संजय दत्तवर हत्यार बाळगल्याचा खुलासा झाला. यामुळे ‘खलनायक’ चित्रपट रिलीज होण्याअगोदरच त्याला अटक करण्यात आली होती. त्यावेळी तो मॉरिशसमध्ये ‘आतिश’ चित्रपटाची शूटिंग करत होता.

१९८२ ते १९८६ पर्यंतचा काळ संजय दत्तच्या फिल्मी करिअरसाठी खूपच वाईट ठरला. यादरम्यान त्याचा ‘जानी’, ‘आय लव्ह यू’, ‘मै आवारा हॅूँ’, ‘बेकरार’, ‘मेरा फैसला’, ‘जमीन आसमान’, ‘दो दिलो की दास्तान’, ‘मेरा हक’ आणि ‘जीवा’ यासारखे बरेच चित्रपट बॉक्स आॅफिसवर अयशस्वी ठरले. फक्त १९८५ मधील ‘जान की बाजी’ हा चित्रपट सरासरी यशस्वी झाला होता.  

* रेडिओ जॉकी बनून केले मनोरंजन 
बहुतेक जणांना कदाचित माहित नसेल की, जेल मध्ये शिक्षा भोगत असताना संजय दत्त रेडिओ जॉकी बनून हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेत अनाउंसमेंट करुन लोकांचे मनोरंजन करीत होता. आयुष्यात अनेक खडतर समस्यांना तोंड देणाºया संजय दत्तच्या आयुष्यात २००३ मध्ये असा प्रसंग आला, जेव्हा त्याचा ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामुळे तर संजू बाबाचे रील आणि रियल लाइफच बदलून गेली.  

* तीन वेळा केले लग्न 
आपणास कदाचित माहित नसेल की, संजू बाबाचे तीनदा लग्न झाले आहे. त्याची पहिली पत्नी ऋचा शर्मा हिचे ब्रेन ट्यूमरच्या कारणाने निधन झाले. त्यानंतर त्याने रिया पिल्लै हिच्याशी लग्न केले, मात्र लवकरच दोघेजण वेगळे झाले. शेवटी त्याने मान्यता सोबत लग्न केले आणि आता दोघांचे दोन मुलेदेखील आहेत. 
२००८ मध्ये संजयने तिसरे लग्न मोठ्या नाटकीय स्वरुपात केले होते. दोन वर्षापर्यंत आपल्या लव अफेअरला लपवून संजय दत्तने मान्यता सोबत मुंबईच्या एका अपार्टमेन्टमध्ये लग्न केले, मात्र या लग्नावरुनही वाद झाला होता.  

संजू बाबाचा खास मित्र सलमान खानने एका मुलाखतीत, संजू बाबा एक चांगला गायकही आहे असे सांगितले होते. याशिवाय तो गिटार सारखे इन्स्ट्रुमेंट्सदेखील वाजवतो. अमेरिकेच्या एका कॉन्सर्टमध्ये त्याला ‘बेस्ट  एयर गिटारिस्ट’ साठी गोल्ड मेडल देण्यात आले आहे. 
सध्या संजय दत्त आपल्या आगामी ‘भूमि’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे, ज्यात त्याच्यासोबत अदिती राव हैदरी असेल. या चित्रपटात ती संजू बाबाच्या मुलीची भूमिका साकारणार आहे.  

Also Read : संजय दत्त मुलगी त्रिशालाचा बर्थ डे असा बनवणार 'खास'!

source : khaskhabar.com 

Web Title: Birthday Special: 'This' secret associated with Sanjay Dutt's life may not have been known to you!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.