birthday special : वाचा, कंगना राणौतची काही वादग्रस्त वक्तव्ये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2017 10:25 IST2017-03-23T04:55:32+5:302017-03-23T10:25:32+5:30

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत हिचा आज (23) वाढदिवस. कंगना तिचा वाढदिवस मुंबईतच साजरा करणार आहे. त्यामुळे कंगनाचे कुटुंबीय आणि ...

Birthday special: Read, some controversial statements from Kanga Rana! | birthday special : वाचा, कंगना राणौतची काही वादग्रस्त वक्तव्ये!

birthday special : वाचा, कंगना राणौतची काही वादग्रस्त वक्तव्ये!

लिवूडची क्वीन कंगना राणौत हिचा आज (23) वाढदिवस. कंगना तिचा वाढदिवस मुंबईतच साजरा करणार आहे. त्यामुळे कंगनाचे कुटुंबीय आणि तिचा खास पंडित मुंबईत पोहोचले आहेत. आपल्या शर्तींवर जगणारी कंगनाने बॉलिवूडमध्ये मोठा संघर्ष केला. पण ती डगमगली नाही.
२३ मार्च १९८७ रोजी हिमाचल प्रदेशमधील मनालीजवळील एका छोट्याशा गावात कंगना जन्मली. बालपणी कंगनाचा ग्लॅमर दुनियेशी कोणताच संबंध नव्हता. कंगनाचे वडील अमरदीप व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि आई आशा शिक्षिका आहे. कंगनाचे बालपण डेहरादूनमध्ये गेले. तेथेच डीएव्ही हायस्कूलमधून कंगनाने आपले शिक्षण पूर्ण केले. 
तुम्ही माझ्यावर प्रेम करू शकता किंवा माझा तिरस्कार करू शकता. पण माझ्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असे कंगना नेहमीच म्हणते. खरे बोलायला ती कधीही घाबरत नाही. त्यामुळेच तिची अनेक वक्तव्ये वादग्रस्त ठरली, पाहु यात कंगनाची अशीच काही वादग्रस्त वक्तव्ये...

हृतिकला म्हटले होते, ‘सिली एक्स’



कंगना व हृतिक रोशन यांचा वाद चांगलाच गाजला होता. अद्यापही हा वाद शांत झालेला नाही. एका मुलाखतीत तिला ‘आशिकी3’बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. हा चित्रपट तू हृतिकमुळे सोडला, हे खरे आहे का? असे तिला विचारले गेले होते. यावर ती म्हणाली होती, होय, मी सुद्धा अशा अफवा ऐकल्या. सिली एक्स पार्टनर्स पब्लिसिटीसाठी अशी कारस्थाने का करतात, मला माहित नाही. माझ्यासाठी तो चॅप्टर संपला आहे. कंगनाचा हा वार हृतिकच्या कधी नव्हे इतका जिव्हारी लागला होता. यानंतर हृतिकने कंगनाला कायदेशीर नोटीसही धाडले होते.

मी शाहरूखसोबत काम करणार नाही



अलीकडे कंगनाने शाहरूख खानबद्दल वादग्रस्त विधान केले होते. मी कधीही शाहरूख खानसोबत काम करणार नाही, याबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही, असे कंगना म्हणाली होती.

करण जोहरला म्हटले, ‘मुव्ही  माफिया’



काही आठवड्यांपूर्वी कंगना राणौत ‘रंगून’च्या प्रमोशनसाठी सैफ अली खानसोबत करण जोहरच्या शोवर गेली होती. या शोदरम्यान कंगनाने करणला बरेच काही सुनावले होते. मी जर बायोपिक बनवले तर तू त्यात एका स्टीरिओटिपिकल माणसाची भूमिका साकारशील. जो अतिशय घमंडी आणि बाहेरच्या लोकांप्रती दुजाभाव ठेवणारा असेल. आपण त्या व्यक्तिला ‘मुव्ही माफिया’ म्हणू शकतो, असे कंगना करणला उद्देशून म्हणाली होती. कंगनाने असे  ‘मुव्ही माफिया’ म्हणून कंगनान करणला चांगलेच डिवचले होते. अर्थात संधी मिळताच त्यानेही कंगनाला सुनावले होते. कंगनाच्या वूमन आणि व्हिक्टिम कार्डने मी परेशान झालोय.  बॉलिवूड इतके वाईट असेल तर सोडून द्यावे, असे करण तिला उद्देशून म्हणाला होता.

ALSO READ : ​कंगना राणौत संतापली; मला बॉलिवूड सोड सांगणारा करण जोहर कोण?

  मी ‘नकोशी’ होते



  मी ‘नकोशी’ होते. बालपणी वारंवार मला ‘नकोशी’ म्हणून हिणवले गेले. माझ्या मात्यापित्यांना रंगोलीच्या ( कंगनाची  बहीण) आधी एक अपत्य होते. मात्र जन्मानंतर दहाच दिवसात त्याचा मृत्यू झाला होता. माझ्या आईवडिल हे दु:ख विसरू शकले नव्हते. यानंतर मी झाले.  दुसरी मुलगी झाली हे बघून माझे आईवडील दु:खी झाले. विशेषत: माझी आई पाहुण्यांसमोर मला हिणवले जायचे...मी जन्मल्याबद्दलचे दु:ख उगाळले जायचे. वारंवार हे ऐकणे वेदनादायी होते, असे कंगना एका मुलाखतीत म्हणाली होती.

१७ वर्षांची असताना झाले शारिरीक शोषण



मी केवळ १७ वर्षांंची असताना बॉलिवूडच्याच एका व्यक्तिने माझे लैंगिक शोषण केले होते. मी त्याला चांगलाच धडाही शिकवला होता. जखमी असूनही मी त्याच्या मुस्काटात लगावली होती, असे कंगनाने खुलेआम सांगितले होते. याप्रकरणी कंगनाने पोलिसात गुन्हाही दाखल केला होता.

बॉलिवूडमध्ये पैसा व श्रेय अभिनेते घेऊन जातात



बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींना दुय्यम वागणूक दिली जाते. बॉलिवूडचा पैसा आणि श्रेय दोन्ही अभिनेतेच घेऊन जातात, असे परखड मत कंगनाने अलीकडे बोलून दाखवले होते.

जस्ट गुड फ्रेन्डचा अर्थ बॉलिवूडमध्ये भलताच होतो



कंगनाच्या जस्ट गुड फ्रेन्डवरील बयानाने अनेकांची बोलती बंद केली होती. बॉलिवूडमध्ये जस्ट अ गुड फे्रन्डचा अर्थ वेगळाच होता. त्याच्यासोबत तुम्ही काहीही करू शकतात. फिजिकलही होऊ शकता, असे कंगना म्हणाली होती.

आय एम बेस्ट



एका प्रश्नाच्या उत्तरादाखल कंगनाने स्वत:ला बॉलिवूडची सर्वोत्तम अभिनेत्री म्हटले होते. माझ्यामते,बॉलिवूडमध्ये आजघडीला माझ्यइतकी बेस्ट अ‍ॅक्ट्रेसच नाही. त्यामुळे माझी स्पर्धा कुणाशीही नाही, असे ती म्हणाली होती.

Web Title: Birthday special: Read, some controversial statements from Kanga Rana!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.