Birthday special : राणी मुखर्जीला योगायोगाने मिळाला होता ‘कुछ कुछ होता है’ सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 09:52 IST2017-03-21T04:22:12+5:302017-03-21T09:52:12+5:30
बॉलीवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वत:चे वेगळेस्थान तयार करणारी राणी मुखर्जी आज (२१ मार्च) वाढदिवस. सध्या मातृत्वाचा आनंद घेत ...

Birthday special : राणी मुखर्जीला योगायोगाने मिळाला होता ‘कुछ कुछ होता है’ सिनेमा
ब लीवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वत:चे वेगळेस्थान तयार करणारी राणी मुखर्जी आज (२१ मार्च) वाढदिवस. सध्या मातृत्वाचा आनंद घेत असलेल्या राणीबद्दल जाणून घेऊ यात काही माहित नसलेल्या गोष्टी...
![]()
माजी दिग्दर्शक राम मुखर्जी आणि माजी पार्श्वगायिक कृष्णा मुखर्जी यांच्या घराण्यात राणीचा जन्म झाला. तिचा मोठा भाऊ राजा हा निर्माता आणि दिग्दर्शक आहे. अभिनेत्री काजोल आणि दिग्दर्शक अयान मुखर्जीची ती चुलत बहिण आहे.
![]()
सुरुवातीला राणीला अभिनयक्षेत्रात रस नव्हता. तिने उडिसी नृत्याचेही धडे घेतले आहेत. सन १९९७ मध्ये ‘राजा की आयेगी बारात’ या चित्रपटाद्वारे राणीने बॉलिवूडमध्ये एन्टी केली. हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार यश मिळवू शकला नाही. पण यातील राणीच्या अभिनयाने पे्रक्षकांना मंत्रमुग्ध केले.
![]()
पुढचे वर्ष राणीसाठी यशाचे ठरले. आमिर खानच्या ‘गुलाम’ व शाहरूख खानच्या ‘कुछ कुछ होता है’ मध्ये राणीला संधी मिळाली. हे दोन्ही सिनेमे सुपरहिट ठरले. ‘कुछ कुछ होता है’साठी राणीने सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार पटकावला. ‘कुछ कुछ होता है’साठी आधी टिष्ट्वंकल खन्नाचे नाव ठरले होते. पण तिने हा चित्रपट नाकारला आणि ही भूमिका राणीच्या वाट्याला आली. राणीचा आवाज काहीसा जाड असल्याने करण जोहर तिच्या भूमिकेला दुसºया कुणाच्या आवाज देऊ इच्छित होता. पण राणीने मेहनत केली आणि शेवटी स्वत:चा आवाज स्वत: डब केला.
![]()
यानंतर १९९९ ते २००२ या काळात मात्र राणीच्या यशस्वी करिअरला चांगलाच ब्रेक लागला. ‘हॅलो ब्रदर’,‘बादल’, ‘हल दिल जो प्यार करेगा’,‘हद कर दी आपने’,‘बिच्छू’ असे एकापाठोपाठ एक आलेले राणीचे सगळेच सिनेमे आपटले.
![]()
२००२ च्या अखेरिस यश राज बॅनरच्या ‘साथियां’ने मात्र राणीच्या करिअरला बुडण्यापासून वाचवले. २००३ मध्ये ‘चलते चलते’मध्ये पुन्हा राणीला शाहरूखसोबत काम करण्याची संधी मिळाली. हे दोन्ही सिनेमे सुपरहिट ठरले,
![]()
२००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘वीरझारा’मध्ये राणीने पाकिस्तानी वकिलाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट ‘बर्ली चित्रपट महोत्सवात’ही दाखविण्यात आला होता. ‘ब्लॅक’ या चित्रपटात राणीने बहि-या आणि आंधळ्या मुलीची भूमिका साकारून आपल्या अभिनयाची जादू सर्वांवर चालवली. या चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.
![]()
२१ एप्रिल २०१४ रोजी राणीने पॅरिसमध्ये दिग्दर्शक व निर्माता आदित्य चोप्राशी गुपचूप लग्न केले. ९ डिसेंबर २०१५ रोजी या दोघांना एक मुलगी झाली. तिचे नाव आदिरा ठेवण्यात आले आहे.