Birthday Special : ​‘ही’ व्यक्ती ठरली होती देवआनंद आणि सुरैय्याच्या लव्ह स्टोरीतील व्हिलन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 10:52 IST2017-09-26T05:22:48+5:302017-09-26T10:52:48+5:30

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते देव आनंद यांची आज (२६ सप्टेंबर) जयंती. २६ सप्टेंबर १९२३ रोजी   पंजाबच्या गुरदास कस्बेमध्ये त्यांचा ...

Birthday Special: 'This person' was Devanand and Suraiya's love story villain! | Birthday Special : ​‘ही’ व्यक्ती ठरली होती देवआनंद आणि सुरैय्याच्या लव्ह स्टोरीतील व्हिलन!

Birthday Special : ​‘ही’ व्यक्ती ठरली होती देवआनंद आणि सुरैय्याच्या लव्ह स्टोरीतील व्हिलन!

लिवूडचे दिग्गज अभिनेते देव आनंद यांची आज (२६ सप्टेंबर) जयंती. २६ सप्टेंबर १९२३ रोजी   पंजाबच्या गुरदास कस्बेमध्ये त्यांचा जन्म झाला होता.  हिंदी चित्रपटसृष्टीत  देव आनंद यांना ‘रोमान्सचा बादशहा’ म्हणून ओळखले जाते.  आपल्या आत्मकथेची सुरूवातही त्यांनी ‘रोमांसिंग विद लाईफ’या शीर्षकाने  केली आहे. आज देव आनंद आपल्यात नाही. वयाच्या ८८ व्या वर्षी डिसेंबर २०११ मध्ये त्यांचे निधन झाले. पण त्यांचे चित्रपट  आणि त्यांच्या रूपातील एक चिरतरूण अभिनेता आजही सर्व सिनेरसिकांच्या मनात जिवंत आहे. याच सदाबहार अभिनेत्याविषयी जाणून घेऊ यात  काही खास गोष्टी...



 देव आनंद यांचे वडील वकील होते. पण  देव आनंद यांना अभिनयात रस होता. हिरो बनण्याच्या ध्यासापोटी देव आनंद मुंबईत आले. त्यावेळी त्यांच्या खिशात केवळ ३० रुपए होते. ना ओळख, ना डोक्यावर छत. ३० रुपए संपल्यानंतर  देव आनंद यांनी मिल्ट्री सेंसर आॅफिसमध्ये १६५ रुपए मासिक वेतनावर काम सुरु केले. सुमारे वर्षभर त्यांनी या ठिकाणी नोकरी केली.
 


अनेक संघर्षानंतर ‘हम एक है’ या चित्रपटातून  देव आनंद यांना ब्रेक मिळाला. यानंतर  देव आनंद यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. पांढरा शर्ट आणि काळा कोट ही फॅशन देवानंद यांच्यामुळेच फेमस झाली होती.  देव आनंद यांना काळ्या कोटमध्ये पाहून मुली देहभान विसरायच्या. अनेक मुलींनी त्यांच्यावर भाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे म्हटले जाते. त्यामुळे देव आनंद  यांच्या काळ्या कोटवर कोर्टाने  बंदी लादली होती, असे म्हटले जाते. 



देवानंद मनाने रोमॉन्टिक होते. अभिनेत्री सुरैय्या हे देवानंद यांचे पहिले प्रेम.  पहिल्याच नजरेत देवानंद सुरैय्याच्या प्रेमात पडले होते.  ‘रोमांसिंग विद लाईफ’ या आत्मचरित्रात देवानंद यांनी सुरैय्याबद्दल विस्ताराने लिहिले आहे. त्याकाळात देवानंद यांनी सुरैय्याला तीन हजार रूपयांची हि-याची अंगठी दिली होती. सुरैय्या व देवानंद दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते.   सुरैय्याबरोबर त्यांचे प्रेमसंबंध चार वर्षांपर्यंत राहिले. मात्र दोघे लग्न करु शकले नाही. त्यांचा धर्म त्यांच्या लग्नात अडसर ठरला. देव आनंद हिंदू होते तर सुरैय्या मुस्लिम. सुरैय्याच्या आजीला हे नाते मान्य नव्हते. त्यामुळे सुरैय्याने माघार घेतली. पण यानंतर सुरैय्याने कधीच लग्न केले नाही. 
 देव साहेब आणि सुरेय्या यांची पहिली भेट एका रेल्वे प्रवासादरम्यान झाली होती. देव आनंद नेहमी मुंबई ते पुणे असा प्रवास करायचे. एकदा सुरैय्या ज्या कंपार्टमेंटमध्ये चढली त्याच कंपार्टमेंटमध्ये देव आनंद हजर होते. सुरैय्या यांना बघताच देव साहेब त्यांच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी देव आनंद यांचा चित्रपटात येण्यासाठी संघर्ष सुरु होता. तर सुरैय्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री होती. या दोघांनी सात चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.बरेच दिवस यांचे प्रेमप्रकरण लपून राहिले. मात्र १९५१च्या दरम्यान सुरैय्याचे कुटुंबिय तिच्यावर पाळत ठेऊ लागले. ‘अफसर’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान या दोघांचे प्रेमप्रकरण जगापुढे आले. तेव्हा या दोघांना विरोधाला सामोरे जावे लागले होते.



सुरैय्या अविवाहित राहिली. पण देवानंद यांनी मात्र सुरैय्या आयुष्यातून गेल्यानंतर एकदिवस अचानक लग्न केले. त्यांच्या लग्नाचा हा किस्सा बराच गाजला होता. १९५४ मध्ये चित्रपटाच्या सेटवर लंचबे्रक झाला अन् या लंचब्रेकमध्ये देवानंद यांनी त्यांची सहअभिनेत्री कल्पना कार्तिकसोबत लग्न केले होते. पण हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. दोघांना दोन मुले झालीत. सुनील आनंद आणि देविना आनंद अशी या दोन मुलांची नावे. देविना हे नाव सुरैय्याच्या आवडीचे होते. देवसोबत लग्न झाल्यास आणि मुलगी झाल्यास तिचे नाव देविना ठेवायचे असे सुरैय्याने ठरवले होते.



ALSO READ : देव आनंदच्या आयुष्यात आलेल्या महिला

‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटात देव आनंद यांची बहीण बनण्यास कुणीच राजी नव्हते. त्याकाळात प्रत्येक अभिनेत्री देव आनंद यांची हिरोईन बनण्याचे स्वप्न बघायची. देव आनंद यांच्या बहिणीची भूमिका केल्यावर त्यांच्या अपोझिट भूमिका मिळणार नाही, या भीतीने बहीणीच्या रोलसाठी जवळपास सर्वच अभिनेत्रींनी नकार दिला. पण एका पार्टीत देव आनंद यांनी जीनत अमान हिला पाहिले आणि तिला या भूमिकेची आॅफर दिली. या चित्रपटानंतर जीनत अमान एका रात्रीत स्टार झाली होती.



Web Title: Birthday Special: 'This person' was Devanand and Suraiya's love story villain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.