मिका सिंहच्या ‘किस’चा किस्सा! वाढदिवसाच्या दिवशीच हातात पडल्या होत्या बेड्या!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 11:31 AM2021-06-10T11:31:12+5:302021-06-10T11:34:07+5:30

Mika Singh birthday : बॉलिवूडला अनेक हिट गाणी देणा-या मिका सिंहचा आज वाढदिवस. मिका हा गाण्यांसोबतच आपल्या खासगी आयुष्यामुळं देखील चर्चेत असतो.

birthday special Mika Singh's infamous kiss with Rakhi Sawant | मिका सिंहच्या ‘किस’चा किस्सा! वाढदिवसाच्या दिवशीच हातात पडल्या होत्या बेड्या!!

मिका सिंहच्या ‘किस’चा किस्सा! वाढदिवसाच्या दिवशीच हातात पडल्या होत्या बेड्या!!

googlenewsNext
ठळक मुद्देआता मिका आणि राखी सुद्धा ही घटना विसरलीये, असे म्हटले तर वावगे होणार नाही. कारण अलीकडे राखी मिकाला मिठी मारताना दिसली होती.

बॉलिवूडला अनेक हिट गाणी देणा-या मिका सिंहचा आज वाढदिवस. मिका सिंहला  (Mika Singh) त्याच्या गाण्यांसाठी ओळखले जाते तेवढाच तो वादांमुळे चाहत्यांच्या लक्षात राहिलेला आहे. 2006 चा वाढदिवस मिका कधीही विसरणार नाही. होय, कारण या वाढदिवसाला राखी सावंतमुळे त्याच्यावर जेलमध्ये जाण्याची वेळ आली होती. (Mika Singh birthday)

2006 मध्ये मिकाने ग्रॅण्ड बर्थ डे पार्टी ठेवली होती. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी या पार्टीत सहभागी झाले होते. राखी सावंत (Rakhi Sawant) हिलाही या बर्थ डे पार्टीचे निमंत्रण होते.  पार्टी रंगात आली होती, सगळे बेधुंद होऊन डान्स करत होते. अचानक मिकाच्या मनात काय आले, माहित नाही. त्याने डान्स करत असतानाच राखीला जबरदस्तीने किस केले. मग काय या प्रकाराने राखी बिथरली. इतकी की,मिकाने आपल्याला जबरदस्तीने किस केल्याची तक्रार तिने पोलिसांत दाखल केली होती.  
असे म्हणतात की, राखीने जबरदस्ती मिकाच्या चेह-याला केक लावला. मिकाला याच गोष्टीचा राग आला आणि त्याने चक्क तिला धडा शिकवण्यासाठीच सर्वांसमोर किस केले. त्यानंतर राखीनं बाहेर जाऊन खूप गोंधळ घातला होता.

राखीच्या तक्रारीनंतर काही तासांतच मिका तुरुंगात पोहोचला. वाढदिवस बाजुला राहिला आणि मिकाला बेड्या पडल्या. यानंतर काही दिवस मिकाला तुरुंगात घालवावे लागले होते. अर्थात पुढे राखीने त्याच्याविरोधातील केस मागे घेतली होती.
हा पब्लिसिटी स्टंट होता की आणखी काही हे आम्हाला ठाऊक नाही. पण तेव्हा किस चा हा किस्सा चांगलाच गाजला होता. याचे फोटो व व्हिडीओ तुफान चर्चेत होते. आज मिकाचा वाढदिवस म्हटल्यावर ही घटना पुन्हा चर्चेत आली एवढेच.

आता मिका आणि राखी सुद्धा ही घटना विसरलीये, असे म्हटले तर वावगे होणार नाही. कारण अलीकडे राखी मिकाला मिठी मारताना दिसली होती. काही दिवसांपूर्वीच सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत मिका आणि राखी मिठी मारताना  दिसले होते.  

Web Title: birthday special Mika Singh's infamous kiss with Rakhi Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.