वयाच्या १४ व्या वर्षी केला होता डेब्यू, आता अभिनयापासूनच आहे दूर, जाणून घ्या त्याच्या या खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 12:46 PM2021-06-25T12:46:29+5:302021-06-25T12:49:55+5:30

'शहेनशाह' चित्रपटात त्यांनी अमिताभ बच्चन यांचे बालपणीचे पात्र साकारले होते. या व्यतिरिक्त त्यांनी 'अव्वल नंबर', 'चालबाज', 'इंसानियात' या चित्रपटांतही चांगले काम केले.

BirthdaY Special : Interesting Facts About Aftab Shivdasani That You Should Know | वयाच्या १४ व्या वर्षी केला होता डेब्यू, आता अभिनयापासूनच आहे दूर, जाणून घ्या त्याच्या या खास गोष्टी

वयाच्या १४ व्या वर्षी केला होता डेब्यू, आता अभिनयापासूनच आहे दूर, जाणून घ्या त्याच्या या खास गोष्टी

googlenewsNext

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आफताब शिवदासानी आज 43 वर्षांचा झाला आहे. त्याचा जन्म 25 जून 1978 रोजी मुंबईत झाला होता. बॉलिवूडमध्ये डेब्यू केल्यानंतर आफताबने एकापेक्षा एक हटके भूमिका करत रसिकांची पसंती मिळवली होती.आपल्या अभिनयामुळे त्याने इंडस्ट्रीत एक वेगळं स्थान मिळवलं आहे.

आफताब बराच काळ मोठ्या पडद्यापासून दूर असला तरी त्याचे स्टारडम आजही तसेच आहे. आफताबचे चाहते लाखो आहेत, जे आजही तितकेच त्याला पसंत करतात. जेव्हा आफताब 14 वर्षाचा होता तेव्हा त्याची निवड “बेबी फूड” च्या एका ब्रँडने केली होती. यानंतर आफताब अनेक अ‍ॅड फिल्ममध्ये दिसला.आफताब अनिल कपूरच्या सुपरस्टार फिल्म 'मिस्टर इंडिया' मध्ये दिसला होता. 

'शहेनशाह' चित्रपटात त्यांनी अमिताभ बच्चन यांचे बालपणीचे पात्र साकारले होते. या व्यतिरिक्त त्यांनी 'अव्वल नंबर', 'चालबाज', 'इंसानियात' या चित्रपटांतही चांगले काम केले.1999 साली, वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी त्यांनी राम गोपाल वर्मा यांच्या 'मस्त' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. या चित्रपटात त्याच्याबरोबर उर्मिला मातोंडकरची भूमिका होती.

 हा चित्रपट सुपरहिट ठरला.यानंतर त्याला बेस्ट मेल डेब्यू आणि मोस्ट प्रॉमिसिंग न्यूकमर सारखे अनेक पुरस्कारही मिळाले. आफताबने 'मस्ती' आणि 'ग्रँड मस्ती' आणि 'ग्रेट ग्रँड मस्ती' यासह अनेक  चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. आफताब आणि निन दुसांज यांनी 2014 मध्ये लगीनगाठ बांधली होती. या दोघांना एक मुलगीही आहे. 

आफताब मुलीसह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करतान दिसतो. रुपेरी पडद्यावर त्याचे दर्शन घडत नसले तरी सोशल मीडियावर मात्र तो प्रचंड सक्रीय असतो. त्यामुळे बॉलिवूडपासून दूर जात त्याचे खासगी आयुष्य तो एन्जॉय करत आहे.

 

त्याच्या चाहत्यांना त्यांच्या सोशल मीडियावर नजर टाकल्यास तो सध्या काय करतो जाणून घ्यायचे असेल तर सोशल मीडियावर त्याची उत्तर त्यांना मिळतील. तुर्तास चॉकलेट बॉय दिसणारा आफताबचा काळानुसार लूकही बदलला आहे. 
 

Web Title: BirthdaY Special : Interesting Facts About Aftab Shivdasani That You Should Know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.