Birthday Special: इमरान हाश्मीच्या चित्रपटांची ‘ही’ गाणी ऐकून तुम्हीही व्हाल ‘रोमॅन्टिक’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2017 09:50 IST2017-03-24T04:20:51+5:302017-03-24T09:50:51+5:30
बॉलिवूडचा ‘सीरिअल किसर’ इमरान हाश्मी याचा आज (२४ मार्च) वाढदिवस. आज इमरानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चित्रपटातील काही गाणी आम्ही घेऊन आलो आहोत. शिवाय इमरानबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टीही तुम्हाला सांगणार आहोत...

Birthday Special: इमरान हाश्मीच्या चित्रपटांची ‘ही’ गाणी ऐकून तुम्हीही व्हाल ‘रोमॅन्टिक’!
२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरानचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत. भट्ट कुटुंबाशी असलेल्या या रक्ताच्या नात्याचा इमरानला बराच फायदा झाला. पण यानंतर इमरानने स्वत:ला सिद्ध केले.
सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता. पण दिग्दर्शनात तो फार रमला नाही. कारण तोपर्यंत त्याला अभिनय खुणावू लागला होता.
सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले. यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली. या चित्रपटात त्याच्या अपोझिट दिसली ती मल्लिका शेरावत. या चित्रपटाची कथा आणि त्यातील बोल्ड सीन्सची बरीच चर्चा झाली होती. या चित्रपटानंतर लोक इमरानला सीरियल किसर म्हणूनच ओळखू लागले. निर्मात्यांनीही इमरानच्या या इमेजचा पुरेपूर फायदा घेतला.
‘गँगस्टर’ चित्रपटातील कंगना आणि इमरानचा आॅनस्क्रीन रोमान्स सर्वांनाच वेड लावून गेला. यातील गाणी तर आजही लोकांच्या फेवरेट लिस्टमध्ये आहेत.
पुढच्याच वर्षी म्हणजे २००५ मध्ये इमरान व तनुश्री दत्ता यांचा ‘आशिक बनाया आपने’ रिलीज झाला. या चित्रपटाचे टायटल साँग अतिशय बोल्ड होते. यातील तनुश्रीच्या बोल्ड अभिनयावर बरीच टीकाही झाली. यातील इमरानच्या अभिनयाचे कौतुक झाले. पण स्टार म्हणून त्याला खरी ओळख अद्यापही मिळाली नव्हती. २००६ मध्ये आलेल्या ‘गँगस्टर‘ने इमरानला ही ओळख दिली. यात इमरानसोबत दिसली ती कंगना राणौत.
‘जन्नत’मधील इमरान सोनलसोबत दिसला. यातील ‘जन्नत’ या गाण्याने लोकांच्या मनाचा ठाव घेतला.
यानंतर आलेल्या ‘द डर्टी पिक्चर’मध्ये इमरानने पुन्हा एकदा त्याच्यातील प्रगल्भ अभिनेत्याची झलक दाखवली. यानंतर ‘जन्नत’,‘मर्डर२’, ‘राज3’ अशा अनेक चित्रपटामधून इमरान दिसला. ‘अजहर’या चित्रपटातील इमरानची भूमिका प्रचंड गाजली.
‘वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई’ या चित्रपटातील इमरान आणि प्राची देसाई या दोघांवर चित्रीत ‘पी लूँ’ हे रोमॅन्टिक गाणे कुणी कसे विसरू शकेल?
‘डर्टी पिक्चर’मधील डायलॉग्स आणि बोल्ड सीन्स कुणीच विसरू शकत नाही. पण सोबत यातील सुफी गाणेही विसरण्याजोगे नाही.
‘अजहर’ या चित्रपटात इमरानने क्रिकेटपटू अजरूद्दीन याची व्यक्तिरेखा पडद्यावर जीवंत केली. यात संगीत बिजलानीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नरगिस फाखरीसोबतचे इमरानचे एक रोमॅन्टिक गाणे आहे. ते तुम्ही पुन्हा ऐकायलाच हवे.