बर्थडे स्पेशल : हृतिक रोशनबद्दल १० रंजक फॅक्ट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 11:50 IST2017-01-10T11:47:32+5:302017-01-10T11:50:11+5:30

बॉलीवूडचा ‘ग्रीक गॉड’ हृतिक रोशन आज ४३ वर्षांचा झाला. मोठ्या पडद्यावरील खराखुरा सुपरस्टार ज्याच्या पहिल्याच चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: ‘याड ...

Birthday Special: 10 Funky Facts about Hrithik Roshan | बर्थडे स्पेशल : हृतिक रोशनबद्दल १० रंजक फॅक्ट्स

बर्थडे स्पेशल : हृतिक रोशनबद्दल १० रंजक फॅक्ट्स

लीवूडचा ‘ग्रीक गॉड’ हृतिक रोशन आज ४३ वर्षांचा झाला. मोठ्या पडद्यावरील खराखुरा सुपरस्टार ज्याच्या पहिल्याच चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: ‘याड लावलं’. ‘कहो ना प्यार है’मधून तो बॉलीवूडमध्ये आला तेव्हापासून आजतागायत चाहत्यांच्या मनावरअधिराज्य गाजवत आहे.

मागचे वर्ष त्याच्यासाठी फारसे यशस्वी राहिले नाही. चित्रपटांपेक्षा तो कंगणा राणौतसोबत सुरू असलेल्या वादामुळेच अधिक चर्चेत राहिला. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही ‘आॅल इज वेल’ नाही. पण या नव्या वर्षात नव्या दमाने पुन्हा एकदा आपला ठसा उमटविण्यासाठी तो सज्ज झाला आहे.

हेवा वाटावी अशी शरीरयष्टी, वर्ल्ड-क्लास डान्सर, कुशल अभिनेता आणि कोणीही प्रेमात पडावे असे सौंदर्य त्याला बॉलीवूडच्या ‘एलिट’ फळीमध्ये नेऊन बसवते. ऐतिहासिक चित्रपट असो वा सुपरहीरो फिल्म, हृतिक जोखीम घेण्यात कधीच मागे-पुढे पाहत नाही. वैविध्यपूर्ण चित्रपट करण्याकडे त्याचा कल असतो.

जगभरात हृतिकचे चाहते आहेत. त्याच्याविषयी ब्लॉग्स लिहिले जातात. त्याच्या फिटनेस ट्रेनिंगपासून ते मुलांसोबत केलेली धमालसुद्धा इंटरनेटवर व्हायरल होत असते. अशा या ग्लोबल सुपरस्टारच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दल फारशा माहित नसलेल्या दहा गोष्टी आम्ही सांगत आहोत.

येणारे वर्ष हृतिकचे कमबॅक इयर ठरावे, अशी शुभेच्छा ‘सीएनएक्स मस्ती’ देत आहे. हॅपी बर्थ डे डुग्गू!!

Hrithik and Family

१. हृतिकचे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदापर्ण ऐंशीच्या दशकात बालकलाकार म्हणून झाले होते. वयाच्या केवळ सहाव्या वर्षी त्याने ‘आशा’ (१९८०) चित्रपटात काम केले होते. त्याचे आजोबा या चित्रपटाचे प्रोड्युसर होते.

२. लहानपणी तो शाळाला दांड्या मारण्यात पटाईत होता. बोलण्यात तोतरेपणा असल्यामुळे तो तोंडी परीक्षेला घाबरून शाळेत जायचाच नाही.

३. उदय चोप्रा आणि हृतिक बालपणापासूनचे मित्र आहेत. चौथीमध्ये असताना त्यांची मैत्री झाली जी आजसुद्धा कायम आहे.

४. वयाच्या १९ व्या वर्षी त्याला ‘स्पायनल डिस्क हर्निएशन’चा त्रास झाला होता. त्यामुळे मी कधीच हीरो होऊ शकत नाही असे त्याला वाटत होते. शारीरिक आजारांनी त्याची पाठ अद्यापही सोडलेली नाही. ३३ व्या वर्षी त्याला उजव्या गडघ्याच्या दुखापतीमुळे सहा महिने हातकुबड्यांचा आधार घ्यावा लागला होता.

५. हृतिकला फोटोग्राफीची खूप आवड आहे. तो जेथे जातो तेथे कॅमेरासोबत घेऊनच जातो. निसर्गरम्य फोटो काढण्याचा त्याला छंद आहे. 

६. पापा राकेश रोशन आजही मुलाला चांगलेच रागावतात. प्रसंगी मारतातसुद्धा. हृतिकने काही चुक केल्यावर वडिलांची बोलणी खावी लागतात. त्यामुळे वडिलांचा त्याला आजही फार धाक वाटतो.

७. सलमान आणि हृतिक आज जरी दुश्मन असले तरी सलमाननेच त्याला पहिल्या चित्रपटासाठी ट्रेन केले होते. ते दोघे एकत्र व्यायाम करीत असत आणि भाईजाननेच त्याला बॉडी बिल्डींगच्या टिप्स दिलेल्या आहेत.

८. त्याच्या वडिलांवर जेव्हा अंडरवर्ल्डकडून प्राणघातक गोळीबार करण्यात आला होता तेव्हा तो एवढा निराश झाला होता की, बॉलीवूड सोडून जाण्याचा तो विचार करू लागला होता. 

९. आपल्या पहिल्याच चित्रपटात कोणतीच कमी न ठेवण्यासाठी त्याने उर्दू भाषासुद्धा शिकली होती. त्याचा फायदा त्याला नंतर ‘जोधा अकबर’मध्येसुद्धा झाला.

१०. हृतिकला जपानला जाण्याची मनापासून इच्छा आहे; परंतु अद्याप तो तेथे जाऊ शकलेला नाही. जपानव्यतिरिक्त त्याला फुकेट (थायलंड) आणि लंडन त्याचे आवडते डेस्टिनेशन आहे. 

Web Title: Birthday Special: 10 Funky Facts about Hrithik Roshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.