करिना 'या' तारखेला देणार बाळाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2016 13:33 IST2016-12-19T13:20:16+5:302016-12-19T13:33:29+5:30

सैफ अली खान आता बाळाच्या आगमनासाठी आतूर झाला आहे. सैफची बेटर हाफ करिना कपूर उद्या मंगळवारी (डॉक्टरांनी करिनाला प्रसूतीसाठी ...

Birth of a child giving birth to 'Kareena' | करिना 'या' तारखेला देणार बाळाला जन्म

करिना 'या' तारखेला देणार बाळाला जन्म

फ अली खान आता बाळाच्या आगमनासाठी आतूर झाला आहे. सैफची बेटर हाफ करिना कपूर उद्या मंगळवारी (डॉक्टरांनी करिनाला प्रसूतीसाठी २० डिसेंबर ही तारीख दिलीयं) बाळाला जन्म देणार आहे. सैफ यामुळे अतिशय आनंदात आहे. इतका की, त्याला हा आनंद त्याला लपता लपवता येत नाहीय. हे बाळ माझे आणि करिनाचे आहे, ही भावना मी शब्दांत व्यक्त करू शकत नाहीय. करिनाचे आणि माझे नाते या बाळाने पूर्ण होणार आहे, अशा शब्दांत सैफने आपला हा आनंद व्यक्त केला आहे.

एका मुलाखतीत सैफने बाळाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.  मी पुन्हा बाप होणार आहे. माझ्या मते,या वयात बाप होण्याचा आनंद मनापासून अनुभवता येतो. कारण या वयात तुम्ही तुमच्या आयुष्यात स्थिर झालेले असता. फारशी चिंता नसते. त्यामुळे या वयात बाळ होण्याचा आनंद लुटता येतो. माझ्यासाठी तर हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. करिना व माझ्या नात्याचे एक वर्तूळ आमचे बाळ पूर्ण करणार आहे, असे सैफ म्हणाला.

प्रेग्नंसीचा संपूर्ण काळ करिनाने मस्तपैकी एन्जॉय केला. अगदी उद्या-परवा बाळाला जन्म देणार असताना करिनाने ख्रिसमस सेलिब्रेशनही केले. परवाच ती एका पार्टीतही दिसली. याबद्दलही सैफला विचारण्यात आले. यावर तो मनापासून हसला. करिना एक धाडसी महिला आहे. प्रेग्नंसीदरम्यान अगदी प्रसूतीच्या दिवसापर्यंत ती अ‍ॅक्टिव्ह आहे, यातच सगळे काही आले. माझ्यामते, ती अन्य महिलांसाठी एक प्रेरणा आहे.  प्रत्येकाने आपले आयुष्य आपल्या पद्धतीने जगावे, या मताची ती आहे आणि आपल्या आयुष्यात ती हेच करते. लग्नानंतरही ती स्वतंत्र आहे. मी तिला कधीच हे करू नको, ते करू नको, असे सांगत नाही. मी तिचा आदर करतो. तिच्या प्रत्येक निर्णयाचा आदर करतो, असे सैफ म्हणाला.

Web Title: Birth of a child giving birth to 'Kareena'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.