बिप्सचे क्रेझी कलेक्शन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2016 16:14 IST2016-09-17T10:44:11+5:302016-09-17T16:14:11+5:30
अलीकडे बिप्सने तिच्या घराची साफसफाई करायला घेतली. यावेळी जुने नवे फुटवियर कपाटाबाहेर आले. या फुटवियरचा एक फोटो बिप्सने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

बिप्सचे क्रेझी कलेक्शन!
स ंदर्याची खाण आणि सेक्सी फिगर म्हणजे बिपाशा बासू. सध्या तरी बिप्स लग्न एन्जॉय करतेय. नवरा करणसिंह ग्रोवर सोबत मौज मज्जा, भटकंती, रोमान्स यात बिप्स सध्या बिझी आहे. अलीकडे बिप्सने तिच्या घराची साफसफाई करायला घेतली. यावेळी जुने नवे फुटवियर कपाटाबाहेर आले. या फुटवियरचा एक फोटो बिप्सने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.Footwear My house is being swallowed by Heels Cleaning असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. हा फोटोपाहून आम्ही तर अवाक झालोच. पण तुम्ही पाहिल्यानंतर तुम्ही अवाक् झाल्याशिवाय राहणार नाही. या फुटवियरने बिप्सचे सगळे घर व्यापले. जिकडे तिकडे निव्वळ फुटविअर... यावरून एकच कळले, ते म्हणजे बिप्स चपला- जोड्यांची भारी शौकीन आहे. बिप्सकडे एकापेक्षा एक सुंदर हिल्स आहेत. तेव्हा तुम्हीही बघा तर बिप्सचे क्रेझी कलेक्शन!