​बिप्स म्हणते, मी करण इतकी रोमॅन्टिक नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 11:18 IST2016-12-06T11:18:49+5:302016-12-06T11:18:49+5:30

मी करण इतकी रोमॅन्टिक नाही, अशी कबुली अभिनेत्री बिपाशा बसूने दिली आहे. आता करण म्हणजे बिप्सचा लाडका हबी करणसिंह ...

Bipes says, I'm not so romantic | ​बिप्स म्हणते, मी करण इतकी रोमॅन्टिक नाही

​बिप्स म्हणते, मी करण इतकी रोमॅन्टिक नाही

करण इतकी रोमॅन्टिक नाही, अशी कबुली अभिनेत्री बिपाशा बसूने दिली आहे. आता करण म्हणजे बिप्सचा लाडका हबी करणसिंह ग्रोवर. प्रेमाच्या बाबतीत मी जरा व्यावहारिक आहे. पण करण अतिशय रोमॅन्टिक आहे. कदाचित याचमुळे आम्ही एकमेकांना अगदी अनुरूप आहोत. यामुळे आमचं नातं व प्रेम संतुलित राहतं, असेही बिपाशा म्हणाली.

काल-परवा झालेल्या स्क्रीन अवार्डवेळी बिपाशाने हे गुपित सगळ्यांशी शेअर केलं. ‘अलोन’ चित्रपटाच्या सेटवर बिपाशा आणि करण या दोघांमध्ये प्रेम फुलेले होते. त्यानंतर ही जोडी विवाह बंधनात अडकली. विवाहानंतर काही महिन्यांतच दोघांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा बॉलिवूड वतूर्ळात रंगल्या होत्या. पण बिपाशाने या बातम्यांत जराही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.  बिपाशा आणि करणच्या मतभेदाबद्दल  चर्चा रंगल्या अगदी तशाच चर्चा हे जोडपे वारंवार प्रसुतीशास्त्रातील तज्ज्ञांची भेट घेत  असल्याने बिपाशाच्या गरोदरपणाची चर्चाही रंगली. पण  हे वृत्तही  बिपाशाने धुडकावून लावले. असे काहीही नाही. मुल होऊ देणं, हा आमच्या आयुष्यातील सर्वांत मोठा निर्णय असेल. तो लोकांनी आमच्यावर सोपवायला हवा,असे ती म्हणाली. आमच्या खासगी आयुष्याचा आदर व्हावा, अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली. 



‘अलोन’नंतर बिपाशा कुठल्याच चित्रपटात दिसली नाही. पण आम्हाला अनेक चित्रपटाच्या आॅफर मिळत आहेत, असे बिपाशाचे म्हणणे आहे. आॅफर्स अनेक आल्या. मात्र चित्रिकरणाच्या तारखा आणि पैसा याबाबतीत आम्ही दोघेही सजग  आहोत, असे तिने सांगितले.  
करण आणि बिपाशाने यावर्षी ३० एप्रिलला लग्नगाठ बांधली होती. अगदी खासगी पद्धतीने त्यांचा विवाह पार पडला होता. पण, त्यानंतर त्यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींकरिता रिसेप्शन ठेवले होते.  

Web Title: Bipes says, I'm not so romantic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.