लग्नानंतर बिपाशा बासूने साइन केला पहिला चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2017 13:59 IST2017-07-07T08:17:51+5:302017-07-07T13:59:44+5:30
2 वर्षांपेक्षा जास्तवेळा चित्रपटांपासून लांब राहिलेल्या बिपाशा बासूच्या फॅन्ससाठी एक खूषखबर आहे. बिपाशा लवकरच मोठ्या पडद्यावर परतणार आहे. सूत्रांकडून ...

लग्नानंतर बिपाशा बासूने साइन केला पहिला चित्रपट
2 र्षांपेक्षा जास्तवेळा चित्रपटांपासून लांब राहिलेल्या बिपाशा बासूच्या फॅन्ससाठी एक खूषखबर आहे. बिपाशा लवकरच मोठ्या पडद्यावर परतणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बिपाशाने क्रियाज इंटरटेनमेंटच्या आगामी चित्रपट साइन केला आहे. चित्रपटाबाबत अजून काही माहिती मिळालेली नाही.पण हे मात्र नक्की आहे लग्नानंतर बिपाशा कामावर परतणार आहे.बिपाशचे फॅन्स तिल्या मोठ्या पडद्यावर बघण्यास नक्कीच उत्सुक असतील यात काही शंकाच नाही. फक्त आता हा चित्रपट तिच्या इतर चित्रपटांप्रमाणे हॉरर नसू देत म्हणजेच झालं. बिपाशाने करण सिंग सोबत 30एप्रिलला 2016ला विवाह केला. करण सोबतचे फोटो बिपाशाने नहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या विवाहाला करण आणि बिपाशाच्या घरातून विरोध होता. कारण करणचा हा तिसरा विवाह होता. करणने याआधी श्रद्धा निगम आणि जेनिफर विंगेटसोबत विवाह केला होता. याआधी बिपाशाचे ही अनेक सहकलाकारांबरोबर नाव जोडले गेले होते. करणच्या आधी बिपाशाचे नाव डीनो मारिया आणि जॉन अब्राहम बरोबर ही जोडले गेले होते. अलोन या चित्रपटाच्या सेटवर करण आणि बिपाशाची ओळख झाली आणि मग या ओळखीच प्रेमात रुपांतर झाले. त्यानंतर ते एकमेकांना डेट करायला लागले आणि यानंतर काहीच दिवसांमध्ये दोघांनी लग्न केले. यांच्या लग्नात बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. मंकी लव्ह कप्लस अशी त्यांची बॉलिवूडमध्ये ओळख आहे. पार्टीच्या ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी नेहमीच दोघे एकत्र येतात. मध्यतंरी बिपाशा बासू प्रेग्नंट असल्याची चर्चा रंगली होती मात्र बिप्सने या गोष्टीचे खंडन केले.