​बिपाशा बसू आयोजकांवर रूसली अन् हॉटेलात जावून बसली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2017 11:52 IST2017-03-07T06:22:39+5:302017-03-07T11:52:39+5:30

बिपाशा बसू सध्या चर्चेत आहे. कुठल्याशा चित्रपटामुळे नव्हे तर एका फसवणुकीच्या आरोपामुळे बिप्स चर्चेत आली आहे. होय, पैसे घेऊनही रँपवर न चालल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आलाय. आता हे संपूर्ण प्रकरण काय, तर हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Bipasha Basu rushed to the organizers and went to the hotel! | ​बिपाशा बसू आयोजकांवर रूसली अन् हॉटेलात जावून बसली!

​बिपाशा बसू आयोजकांवर रूसली अन् हॉटेलात जावून बसली!

पाशा बसू सध्या चर्चेत आहे. कुठल्याशा चित्रपटामुळे नव्हे तर एका फसवणुकीच्या आरोपामुळे बिप्स चर्चेत आली आहे. होय, पैसे घेऊनही रँपवर न चालल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आलाय. आता हे संपूर्ण प्रकरण काय, तर हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

गत ४ मार्चला ‘इंडिया-पाकिस्तान-लंडन फॅशन शो’ नामक एका शोचे आयोजन करण्यात आले होते. डिझाईनर लुब्रा आणि उज्मा रफीक यांनी ब्रिटीश, इंडियन आणि पाकिस्तानी थीमवर या शोचे आयोजन केले होते.  बिपाशा या शोच्या ग्रँड फिनालेची शो स्टॉपर होती. तिच्यासोबत या शोमध्ये काही लोकप्रीय पाकिस्तानी कलाकारही होते. यासाठी बिपाशाने मोठी रक्कमही वसूल केली होती. या शोसाठी बिपाशा तिचा लाडका हबी करण सिंह ग्रोवरसोबत लंडनला पोहोचली. पण अचानक माशी शिंकली अन् शो सुुरु होण्यास काही तास उरले असताना   बिपाशाने स्वत:ला हॉटेलच्या खोलीत बंद करून घेतले. रूममधून बाहेर येण्यास तिने नकार दिला. बिपाशाची मॅनेजर सना कपूर ही सुद्धा या शोसाठी तिच्यासोबत गेली होती. सना हिने बिपाशासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. पण बिपाशाने तिला शिवीगाळ करून बाहेर काढले. शो आॅर्गनायझर गुरबानी कौर यांनाही बिपाशा नाही नाही ते बोलली.

या सगळ्या प्रकारानंतर शोचे आयोजक टेन्शनमध्ये आले. पण बिपाशा बधली नाही. शोच्या व्यवस्थापकांपैकी एक रोनिता शर्मा रेखी यांनी यासंदर्भात स्वत:च्या फेसबुक पेजवर एक मोठी पोस्ट टाकली आहे. बिपाशाने कशाप्रकारे आपली मनमानी केली, हे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे. त्यांनी लिहिले आहे की, या शोसाठी बिपाशाला बोलवले गेले होते. मात्र तिने बळजबरीने पती करणसिंह ग्रोवर याला आणण्याची जिद्द केली. आपली जिद्द पूर्ण करत ती पतीसोबत लंडनला पोहोचली. यानंतर  आवडीचे फाईव्ह स्टार हॉटेल पाहिजे म्हणून ती अडून बसली. आयोजकांवर दबाव टाकून तिने लंडनमध्ये  आवडीच्या फाईव्ह स्टार हॉटेलचा सूट बुक केला. विमानतळावर फोन रिचार्ज करण्यावरून तिची माझ्यासोबत बाचाबाची झाली. यामुळे बिपाशा प्रचंड संतापली. हेअर ड्रेसर, मेकअप आर्टिस्ट आणि डिझाईनर असे सगळे बिपाशासाठी ताटकळत बसले. पण बिपाशा हॉटेलच्या रूममधून बाहेर आली नाही. अखेर बिपाशाशिवाय शो सुरु करावा लागला. कारण बीबीसीवर हा शो लाईव्ह दाखवला जाणार होता. इकडे लोक बिपाशाची प्रतीक्षा करत होते, तर तिकडे बिपाशा पतीसोबत लंडनमध्ये मस्तपैकी फिरत होती. त्याचे काही फोटो बिपाशाच्या सोशल अकाऊंटवर आहेत.

Web Title: Bipasha Basu rushed to the organizers and went to the hotel!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.