बिपाशा बासूने दाखवली चिमुकल्या देवीच्या प्री बर्थडे सेलिब्रेशनची एक झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 08:52 AM2023-11-11T08:52:10+5:302023-11-11T08:55:16+5:30

बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवर अनेकदा इन्स्टाग्रामवर त्यांच्या क्युट देवीची झलक शेअर करत असतात

Bipasha basu karan singh grover shared cute video of daughter devi pre birthday celebration | बिपाशा बासूने दाखवली चिमुकल्या देवीच्या प्री बर्थडे सेलिब्रेशनची एक झलक

बिपाशा बासूने दाखवली चिमुकल्या देवीच्या प्री बर्थडे सेलिब्रेशनची एक झलक

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर सध्या लाडकी लेक देवीचा पहिला वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी मालदिवला पोहोचले आहेत. चिमुकली देवी १२ नोव्हेंबरला १ वर्षांची होणार आहे. आतापासून देवीचं प्री-बर्थ डे सेलिब्रेशन सुरु झालं आहे. अभिनेत्रीने याची झलक चाहत्यांना सोशल मीडियावर दाखवली आहे. 

बिपाशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरीवर देवीचा एक व्हिडीओ शेअर केला होता. यात चिमुकली देवी तिचा प्री-बर्थडे सेलिब्रेट करताना दिसली. देवी या व्हिडीओत केक कापताना दिसली होती. देवीच्या बर्थ डेचा केक  जंगल थीमवर आधारित होता. व्हिडीओमध्ये देवीने मल्टीकलरचा क्युट ड्रेस घातला आहे. देवीने पहिला केप कापला असं कॅप्शन तिने दिलं होतं. 

घरी प्री-बर्थ डे सेलिब्रेशन केल्यानंतर आई- बाबा आणि देवी तिचा वाढदिवस आणखी खास बनवण्यासाठी मालदिवला गेले आहेत. करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशाचं मालदीवमध्ये स्वागत करण्यात आलं. लग्नाच्या 6 वर्षानंतर बिपाशा आणि करण आई-बाबा झाले आहेत. 

 बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवर अनेकदा इन्स्टाग्रामवर त्यांच्या मुलीची गोंडस झलक शेअर करत असतात. ‘अलोन’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बिपाशा आणि करण पहिल्यांदा भेटले होते. त्याचेवळी दोघांची चांगली मैत्री झाली. बघता-बघता त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. वयाच्या 43 व्या वर्षी ऑगस्ट 2022 मध्ये बिपाशाने गरोदर असल्याचं जाहीर केलं. बेबी बंप फ्लाँट करत तिने फोटोशूटसुद्धा केलं होतं.


 

Web Title: Bipasha basu karan singh grover shared cute video of daughter devi pre birthday celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.