वाढलेल्या वजनावरुन हिणवणाऱ्यांना बिपाशा बासूने दिलं सडेतोड उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 18:30 IST2023-10-03T18:26:33+5:302023-10-03T18:30:24+5:30
बिपाशा बसूने अलीकडेच प्रेग्नेंसीनंतर तिच्या वाढत्या वजनावर भाष्य केलं.

Bipasha Basu
गरोदरपणाचा काळ हा कोणत्याही स्त्रीसाठी फार सुखावह नसतोच. मातृत्व मिळणार असल्याचं मानसिक समाधान असलं तरी या काळात तीच वजन वाढतं वाढत्या वजनावरून किंवा सुटलेल्या पोटावरून टोमणे ऐकावे लागत असतील, तर ती गोष्ट नक्कीच तिच्यासाठी निराशाजनक असू शकते. असंच काहीसं झालं आहे अभिनेत्री बिपाशा बसूसोबत.
बिपाशा बसूने अलीकडेच प्रेग्नेंसीनंतर तिच्या वाढत्या वजनावर भाष्य केलं. 'मला या गोष्टींची पर्वा नाही. ट्रोल करणाऱ्यांना सांगू इच्छिते की कृपया ट्रोल करत रहा. कारण मला काही फरक पडत नाही. माझ्यासाठी सध्या माझी मुलगी सर्वात महत्त्वाची आहे. मला नेहमी तिच्यासोबत रहावं वाटतं'.
बिपाशाने सध्या बॉलिवूडमध्ये काम करणं कमी केलं असून ती संपूर्णतः संसारात लक्ष देतेय. बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवर या दोघांचे लग्न 2016 मध्ये झाले होते. बिपाशा आणि करण गेल्या वर्षी 2022 च्या नोव्हेंबरमध्ये आई - बाबा झाले. या दोघांच्या मुलीचे नाव देवी ठेवलंय.
2001 मध्ये ‘अजनबी’ या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ‘अलोन’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बिपाशा आणि करण पहिल्यांदा भेटले होते. त्याचेवळी दोघांची चांगली मैत्री झाली. बघता-बघता त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं.