बायोपिक अद्याप साईन केली नाही - सोनाक्षी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 08:20 IST2016-01-16T01:05:34+5:302016-02-05T08:20:34+5:30
अ भिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने अजून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना ची बायोपिक साईन केली नाही. चित्रपटाचे ...

बायोपिक अद्याप साईन केली नाही - सोनाक्षी
अ भिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने अजून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना ची बायोपिक साईन केली नाही. चित्रपटाचे कथानक पाहून ती आश्चर्यचकित झाली आहे. 'हसीना-द क्वीन ऑफ मुंबई' ही दाऊदच्या बहिणीवर आधारित बायोपिक अजुन सोनाक्षी सिन्हा हिने साईन केली नाही. ती म्हणते,' आम्ही अजून याबाबतीत बोलत आहोत. मी सध्या याविषयी काहीही बोलू शकत नाही. अपूवर्वा लाखिया दिग्दर्शित या चित्रपटात अंडरवर्ल्ड डॉनच्या बहिणीची भावनाविवश कथा यातून मांडण्यात येणार आहे. ' मी खरंतर खूपच आश्चर्यचकित झाले होते. निर्मात्यांना मला या चित्रपटासाठी घ्यावे वाटते याविषयी मला चांगले वाटतेय. चित्रपटातील कथानक पाहून मी फारच आश्चर्यचकित झाले आहे. '