Bigg Boss 11: ​ घाबरायला मी विवेक ओबेरॉय नाही; कुठे भेटू ते सांग! जुबैर खानने सलमान खानला दिली धमकी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 16:06 IST2017-10-09T10:26:46+5:302017-10-09T16:06:37+5:30

‘बिग बॉस’ अपेक्षेप्रमाणे गाजतोय. अर्थात टीआरपीच्या रेसमध्ये नाही तर मीडियात. होय, ‘बिग बॉस’चा स्पर्धक जुबैर खानने या शोचा होस्ट ...

Bigg Boss 11: I am not Vivek Oberoi for fear; Tell us where you meet! Zubair Khan threatens to Salman Khan !! | Bigg Boss 11: ​ घाबरायला मी विवेक ओबेरॉय नाही; कुठे भेटू ते सांग! जुबैर खानने सलमान खानला दिली धमकी!!

Bigg Boss 11: ​ घाबरायला मी विवेक ओबेरॉय नाही; कुठे भेटू ते सांग! जुबैर खानने सलमान खानला दिली धमकी!!

िग बॉस’ अपेक्षेप्रमाणे गाजतोय. अर्थात टीआरपीच्या रेसमध्ये नाही तर मीडियात. होय, ‘बिग बॉस’चा स्पर्धक जुबैर खानने या शोचा होस्ट सलमान खान याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या शनिवारी (७ आॅक्टोबर) वीकेंड एपिसोडमध्ये सलमान खान आला आणि जुबैरवर बरसला. इतका की, जुबैरला ‘तेरी औकात क्या?’असे नॅशनल टीव्हीवर सलमान बोलून गेला.
सलमानने जुबैरला इथेच सोडले नाही तर  ‘ जब तुम यहां आए थे तो तुम्हारी कोई औकात वैसे ही नहीं थी.  यह किसी का दामाद नहीं है. जिस परिवार से यह अपना नाम जोड़ता है इसका उससे कोई लेना-देना नहीं है.  अपनी औकात दिखानी है न तो निकाल गंदगी मेरे सामने. जुबैर यहां अपनी इमेज बनाने आया है या इमेज डुबाने आया है,’असे सलमान बोलला. अख्ख्या जगासमोर झालेला हा अपमान जुबैरच्या चांगल्याच जिव्हारी लागला आणि त्याच रात्री ‘बिग बॉस’च्या घरात जुबैरने झोपेच्या गोळ्या खावून आत्महत्येचा प्रयत्न केला. जुबैरला तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले. यानंतर आज जुबैरने  सलमानविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली. इतकेच नाही तर उपचारानंतर दवाखान्यातून निघाल्यानंतर मीडियासमोर सलमानला जाहिर धमकीही दिली.

‘तू मला कुत्रा बनवणार ना मग कुठे भेटू सांग, फक्त बॉडीगार्डशिवाय समोर ये, अशा शब्दांत तो सलमानवर घसरला. मी विवेक ओबेरॉय नाही, जो सलमानला सोडून देईल. मी त्याला पुढे घेऊन जाईल. सलमानला लोकांचा अपमान करण्याचा शौक आहे. शोमध्ये स्पर्धकांना चॅलेंज करणे, माझी रिपोर्ट काढणे इथपर्यंत ठीक आहे. पण आता मी सलमानची रिपोर्ट काढणार. आता ही लढाई माझी बहीण लढेल. मी सलमानला केवळ इतकेच म्हणेल की, कॅमेºयासमोर मी तुझी लाज वाचवली. मी त्यावेळी चूप राहिलो. त्याने मला ‘नल्ला डॉन’ म्हटले. पण मी काही डॉन नाही. तुला जे करायचे ते कर. मी तुला आव्हान देतो. आधी माझ्या बहीण तुझ्याविरोधात मैदानात उतरतील. मग माझ्या घरातले पुरूष मैदानात उतरतील. तु मला पाहून घेणार होतास. हिंमत असेल तर तर बॉडीगार्डला सोबत न घेता माझ्यापुढे ये, अशी धमकी जुबैरने सलमानला दिली.
अद्याप जुबैरच्या धमकीवर सलमान बोललेला नाही.आता हे प्रकरण कुठल्या स्तराला जाते, ते बघूच,

ALSO READ : या कारणामुळे बिग बॉसचा सूत्रसंचालक सलमान खानविरोधात झाली तक्रार दाखल

Web Title: Bigg Boss 11: I am not Vivek Oberoi for fear; Tell us where you meet! Zubair Khan threatens to Salman Khan !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.