बिग बींनी चौथ्यांदा जिंकला नॅशनल अवॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 16:06 IST2016-03-29T23:06:42+5:302016-03-29T16:06:42+5:30
महानायक अमिताभ बच्चनने ‘पीकू’साठी या वर्षीचा बेस्ट अॅक्टरचा अवॉर्ड जिंकला आहे. त्यांचा हा चौथा नॅशनल अवॉर्ड आहे. ‘पीकू’मध्ये अमिताभ ...

बिग बींनी चौथ्यांदा जिंकला नॅशनल अवॉर्ड
महानायक अमिताभ बच्चनने ‘पीकू’साठी या वर्षीचा बेस्ट अॅक्टरचा अवॉर्ड जिंकला आहे. त्यांचा हा चौथा नॅशनल अवॉर्ड आहे. ‘पीकू’मध्ये अमिताभ बच्चनने एक अशा खडूस बंगाली वयोवृद्धाची भूमिका केली जो आपल्या मुलीवर (पीकू) अवलंबून असतो आणि नेहमी तिच्या सोबत वाद घालीत असतो. ही भूमिका अमिताभ यांनी खरचं फार सुंदर वठवली आहे.
७० च्या दशकापासून चित्रपटात काम करणाºया अमिताभ यांना १९९१ मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. स्व. मुकुल आनंदच्या ‘अग्निपथ’ या चित्रपटासाठी मिळाला. त्यावेळी केंद्रात चंद्रशेखर यांचे सरकार सत्तेवर होते. कांग्रेस सरकार, गांधी परिवार आणि बच्चन कुटुंबातील कटूतेमुळे चंद्रशेखर सरकारने अमिताभ यांना हा पुरस्कार दिल्याची चर्चाही त्यावेळी झाली. त्यानंतर अमिताभ बच्चन आणि गांधी परिवारातील नात्यात कधी सहजता दिसली नाही. ‘अग्निपथ’साठी मिळालेल्या या अवॉर्डवरून बºयाच लोकांमध्ये शंका होती. कारण बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट जास्त चालला नव्हता आणि अमिताभ यांनी यात माफिया गँगस्टरची भूमिका केली होती.
अमिताभ बच्चन यांना दुसरा राष्ट्रीय पुरस्कार संजय लीला भंसालींच्या ‘ब्लॅक’ चित्रपटासाठी २००७ मध्ये मिळाला. मात्र त्यावेळी केंद्रात यूपीए सरकार होते.
बिग बींना तीसरा अवॉर्ड बाल्कीचा चित्रपट ‘पा’ मध्ये आरोच्या भूमिकेसाठी २०१० मध्ये मिळाला आणि आता ‘पीकू’ साठी त्यांना चौथ्यांदा राष्टÑीय पुरस्कार मिळवला आहे.