भूमी पेडणकरने घेतला शाकाहारी बनण्याचा निर्णय, हे आहे यामागचे कारण

By तेजल गावडे | Updated: October 14, 2020 18:21 IST2020-10-14T18:20:18+5:302020-10-14T18:21:50+5:30

बॉलिवूड जगतात बरेच असे सेलिब्रेटी आहेत ज्यांनी शाकाहारी बनण्याचा निर्णय घेतला आहे. आता या यादीत आणखीन एका अभिनेत्रींच्या नावाचा समावेश झाला आहे. ही अभिनेत्री म्हणजे भूमी पेडणेकर.

Bhumi Pedankar decided to become a vegetarian, this is the reason behind it | भूमी पेडणकरने घेतला शाकाहारी बनण्याचा निर्णय, हे आहे यामागचे कारण

भूमी पेडणकरने घेतला शाकाहारी बनण्याचा निर्णय, हे आहे यामागचे कारण

बॉलिवूड जगतात बरेच असे सेलिब्रेटी आहेत ज्यांनी शाकाहारी बनण्याचा निर्णय घेतला आहे. यातील काही सेलिब्रेटींनी विगन बनून जीवन जगण्याचा निर्णय घेतला आहे. आता या यादीत आणखीन एका अभिनेत्रींच्या नावाचा समावेश झाला आहे. ही अभिनेत्री म्हणजे भूमी पेडणेकर.


आपल्या अभिनय कौशल्याने अल्पावधीत भूमी पेडणेकरने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. भूमी पर्यावरण प्रेमी असून ती जलवायू परिवर्तन आणि पर्यावरणाबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करते आहे. त्यामुळे तिला शाकाहारी बनणे जास्त उचित वाटले.हा निर्णय घेण्याचं श्रेय ती तिच्या हवामानासंदर्भातील जागरुकतेला देते.


भूमीने 'क्लायमेट वॉरिअर' हा उपक्रम ही हाती घेतला आहे. यातून ती देशातील लोकांना पर्यावरणाचे संवर्धन करण्यासंदर्भात वेगवेगळ्या प्रकारे सहाय्य करत असते. याबद्दल भूमी म्हणाली, 'अनेक वर्षांपासून मला शाकाहारी व्हायचे होते. मात्र, आपल्या दररोजच्या सवयी बदलणे फार कठीण असते. क्लायमेट वॉरिअरसोबतच्या वाटचालीमुळे मी अनेक गोष्टी शिकले. आता मांस, मासे खाण्याची मला अजिबात इच्छा होत नाही.'

ती पुढे म्हणाली की 'मला मांसाहारी पदार्थ हवेच, असे नाही. पण, मांसाहार सोडण्याचा निर्णय मी लॉकडाउनमध्ये घेतला. खरेतर हे अगदी सहज घडले आहे. आता या गोष्टीला सहा महिने उलटले आहेत आणि मला छान वाटते आहे. माझ्यामध्ये कोणतीही अपराधीपणाची भावना नाही. शारीरिकदृष्ट्याही मी अगदी फिट आहे.'


भूमी पेडणेकरच्या आधी बॉलिवूडचे बरेच सेलिब्रेटी शाकाहारी झाले आहेत. या सेलिब्रेटींमध्ये शाहिद कपूर, करीना कपूर, अनुष्का शर्मा, आमीर खान आणि कंगना राणौतचा समावेश आहे.

Web Title: Bhumi Pedankar decided to become a vegetarian, this is the reason behind it