Bhool Bhulaiyaa 2 Box Office Day 24: बॉक्स ऑफिसवर 'भूल भुलैया २'ची जादू कायम, केली इतक्या कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 01:56 PM2022-06-13T13:56:27+5:302022-06-13T13:57:11+5:30

Bhool Bhulaiyaa 2 : कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया २' चित्रपटाचा चौथा आठवडाही चांगला गेला आहे. चौथ्या रविवारी चांगला व्यवसाय करताना चित्रपटाने ३.४५ कोटींची कमाई केली आहे.

Bhool Bhulaiyaa 2 Box Office Day 24: The magic of 'Bhool Bhulaiyaa 2' remains at the box office. | Bhool Bhulaiyaa 2 Box Office Day 24: बॉक्स ऑफिसवर 'भूल भुलैया २'ची जादू कायम, केली इतक्या कोटींची कमाई

Bhool Bhulaiyaa 2 Box Office Day 24: बॉक्स ऑफिसवर 'भूल भुलैया २'ची जादू कायम, केली इतक्या कोटींची कमाई

googlenewsNext

दिग्दर्शक अनिश बज्मीच्या 'भूल भुलैया २' (Bhool Bhulaiyaa 2) रिलीज झाल्यापासून या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील जादू कमी झालेली नाही. चित्रपटाच्या कमाईचे आकडे याची साक्ष देतात. चित्रपट प्रदर्शित होऊन २४ दिवस उलटले असले तरी बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम आहे. 'भूल भुलैया २' या चित्रपटाने रिलीजच्या चौथ्या रविवारी ३.४५ कोटींचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपट २० मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Aadvani) यांच्या 'भूल भुलैया २' या चित्रपटाचा चौथा आठवडाही चांगला गेला आहे. चौथ्या रविवारी चांगला व्यवसाय करताना चित्रपटाने ३.४५ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत १७१.१७ कोटींचा व्यवसाय केला आहे. गेल्या वीकेंडला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. 'भूल भुलैया २' चित्रपटाने शुक्रवारी १.५६ कोटी, शनिवारी ३.०१ कोटी आणि रविवारी ३.३५ कोटींची कमाई केली आहे.

'भूल भुलैया २' या चित्रपटासमोर कोणताही चित्रपट नसेल, तर कमाई करण्याची चांगली संधी आहे. आता १७ जूनला शिल्पा शेट्टीचा 'निकम्मा' आणि वरुण धवनचा 'जुग-जुग जिओ' चित्रपट २४ जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे, तोपर्यंत 'भूल भुलैया २' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर राज्य करणार आहे. सध्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला नुसरत भरुचाचा 'जानीहित में जरी' हा चित्रपट चित्रपटगृहात असून, त्यामुळे चित्रपटाच्या कमाईवर फारसा परिणाम झालेला नाही. चित्रपटाची कमाई २०० कोटींपर्यंत पोहोचू शकते.

'भूल भुलैया २' च्या बिझनेसबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने ३ दिवसात ५० कोटी रुपये, ५ दिवसात ७५ कोटी रुपये, ९ दिवसात १०० कोटी रुपये, ११ दिवसात १२५ कोटी रुपये आणि १७ दिवसात १५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'भूल भुलैया २' या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणीशिवाय तब्बू, संजय मिश्रा आणि राजपाल यादव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Web Title: Bhool Bhulaiyaa 2 Box Office Day 24: The magic of 'Bhool Bhulaiyaa 2' remains at the box office.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.