ते मलाही ‘सुशांत सिंग राजपूत’ बनवू इच्छितात...! खेसारी लालने शेअर केला शॉकिंग व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 04:43 PM2021-02-19T16:43:59+5:302021-02-19T16:45:24+5:30

काय म्हणाला खेसारी?

bhojpuri actor khesari lal yadav break silence on kajal raghwani allegation | ते मलाही ‘सुशांत सिंग राजपूत’ बनवू इच्छितात...! खेसारी लालने शेअर केला शॉकिंग व्हिडीओ

ते मलाही ‘सुशांत सिंग राजपूत’ बनवू इच्छितात...! खेसारी लालने शेअर केला शॉकिंग व्हिडीओ

googlenewsNext
ठळक मुद्देमाझ्यावर आरोप लावण्यापेक्षा काम करा, मेहनत करा, असे खेसारीने या व्हिडीओत म्हटले आहे.

भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव सध्या आरोपांचा सामना करतोय. भोजपुरी अभिनेत्री काजल राघवनी हिने अलीकडे खेसारी लालवर गंभीर आरोप केले होते. खेसारी आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय, असे तिने म्हटले होते. तिच्या या आरोपाने भोजपुरी इंडस्ट्रीत खळबळ माजली होती. यादरम्यान आता खेसारीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. इंडस्ट्रीतील काही लोक माझा ‘सुशांत सिंग राजपूत’ करण्यावर टपले आहेत, असे तो या व्हिडीओत म्हणतोय.


 
काय म्हणाला खेसारी?

माझ्या मते, जितके ‘प्रेम’ सुशांतला बॉलिवूडमध्ये मिळाले होते, तेच ‘प्रेम’ मला भोजपुरी इंडस्ट्रीतून मिळत आहे. पण मी इतका कमजोर नाही. आजकाल माझे नाव कोरोना पॉझिटीव्ह सारखे झाले आहे. माझे नाव घेतल्याशिवाय लोकांना चैन पडत नाही. मी सुशांतच्याच गावचा आहे, पण म्हणून कमजोर नाही. भोजपुरी इंडस्ट्रीत आल्यापासून मी सर्वांना काट्यासारखा बोचू लागलो आहे. कारण सगळीकडे माझे गाणे वाजतात, माझे चित्रपट चालतात. त्यांना वाटते की, वैतागून मी सुद्धा सुशांतसारखे टोकाचे पाऊल उचलेल. अर्थात मी असे काहीही करणार नाही. पण तरीसुद्धा एखाद्याला इतका त्रास देऊ नका की तो आत्महत्येस प्रवृत्त होईल. हिंदी इंडस्ट्रीने जे सुशांतसोबत केले, ते भोजपुरी इंडस्ट्री खेसारी लाल यादवसोबत करतेय.
 माझ्यासोबत जनता आहे, त्यांनी माझ्यावर केलेल्या प्रेमामुळे मी इंडस्ट्रीमध्ये टिकलो आहे. माझ्यासाठी चाहते संपूर्ण बिहार बंद करु शकतात. त्यामुळे अशा लोकांचा माझ्यावर काही परिणाम होत नाही. तेव्हा माझ्यावर आरोप लावण्यापेक्षा काम करा, मेहनत करा, असे खेसारीने या व्हिडीओत म्हटले आहे.

Web Title: bhojpuri actor khesari lal yadav break silence on kajal raghwani allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.