भन्साळींचा नवा चित्रपट पुढीलवर्षी १५ डिसेंबरला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2016 17:06 IST2016-04-15T00:06:47+5:302016-04-14T17:06:47+5:30
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासह अनेक पुरस्कार आपल्या झोळीत टाकणाºया ‘बाजीराव-मस्तानी’ या सुपरडुपर हिट चित्रपटानंतर संजय लीला भन्साळी यांचा नवा चित्रपट ...

भन्साळींचा नवा चित्रपट पुढीलवर्षी १५ डिसेंबरला?
र ष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासह अनेक पुरस्कार आपल्या झोळीत टाकणाºया ‘बाजीराव-मस्तानी’ या सुपरडुपर हिट चित्रपटानंतर संजय लीला भन्साळी यांचा नवा चित्रपट कुठला असेल, याबद्दल तुम्हाला उत्सूकता असेलच. प्रत्येक नट-नटी आजघडीला भन्साळींसोबत काम करण्यास उत्सूक आहेत. त्यामुळेच केवळ प्रेक्षकच नाही तर बी-टाऊनही भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टकडे डोळे लावून बसले आहे. पण आता प्रतीक्षा संपली आहे. भन्साळींच्या या नव्या चित्रपटाच्या रिलीजसाठी पुढील वर्षी १५ डिसेंबरचा मुहूर्त ठरला आहे. आम्हाला मिळालेल्या बातमीनुसार, ही भन्साळींची आत्तापर्यंतची मेगा मुव्ही असेल. या चित्रपटाचे नाव व कास्ट अद्याप ठरलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भन्साळींनी या चित्रपटाच्या स्क्रीप्टवर काम सुरु केले आहे. तूर्तास तरी या प्रोजेक्टबद्दल फारसे काही बोलायला तयार नाही...पण नव्या प्रोजेक्टची बातमी आली, एवढे काय कमी आहे.