भाग्यश्रीच्या मुलीचा बोल्ड लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 20:58 IST2016-08-06T15:28:39+5:302016-08-06T20:58:39+5:30

‘मैने प्यार किया’ या चित्रपटात सलमान खानसोबत रोमान्स करणारी अभिनेत्री भाग्यश्री ही खूप कमी काळ बॉलीवूडमध्ये राहिली. परंतु, चित्रपटसृष्टीत ...

Bhagyashree's daughter's bold look | भाग्यश्रीच्या मुलीचा बोल्ड लूक

भाग्यश्रीच्या मुलीचा बोल्ड लूक


/>‘मैने प्यार किया’ या चित्रपटात सलमान खानसोबत रोमान्स करणारी अभिनेत्री भाग्यश्री ही खूप कमी काळ बॉलीवूडमध्ये राहिली. परंतु, चित्रपटसृष्टीत तिने आपली वेगळी ओळख बनवलेली आहे. तिची मुलगी अवंतिका दासानी ही खूप चर्चेत आली असून, तिने आपले बोल्ड लूक असलेले फोटो इंस्टागामवर टाकून धमाल उडवून दिली आहे. अवंतिका ही २१ वर्षाची असून, ती सध्या लंडनमधील कास बिजनेस स्कूलमध्ये बिजनेस व मार्केटींगचे शिक्षण घेत आहे.








तिने इंस्टाग्रामवर टाकलेल्या फोटोवरुन तिला प्रवास, डान्स  फॅशन व मित्रांबरोबर पार्टीमध्ये एन्जाय करणे खूप आवडत असल्याचे दिसत आहे. बॉलिवूड सोडल्यानंतर भाग्यश्री विवाहबंधनात अडकली. आज ती दोन मुलांची आई असून, तिचा मुलगा अभिमन्यु हा लवकरच बॉलीवूडमध्ये एन्ट्री करीत आहे. भाग्यश्री सुद्धा सोशल मीडीया नेहमी अ‍ॅक्टीव्ह आहे. अलीकडे तिने पतीसोबत सुट्या एन्जाय करीत असल्याचे फोटो सोशल मीडीयावर टाकले होते. त्यामध्ये ती खूप ग्लॅमरस दिसत होती.

Web Title: Bhagyashree's daughter's bold look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.