ट्रोलर्सवर भडकली मंदिरा बेदी, पुरूषांना ठरवले भित्रे!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 15:42 IST2018-03-25T10:12:47+5:302018-03-25T15:42:47+5:30

‘दिलवाले दुल्हनियां ले जाऐंगे’ या सुपरडुपर हिट चित्रपटात लाज-याबुज-या प्रीति सिंहची भूमिका साकारणारी बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी सध्या प्रचंड ...

Bhadkali temple on the trollers Bedi, men decide Bhiktre !! | ट्रोलर्सवर भडकली मंदिरा बेदी, पुरूषांना ठरवले भित्रे!!

ट्रोलर्सवर भडकली मंदिरा बेदी, पुरूषांना ठरवले भित्रे!!

िलवाले दुल्हनियां ले जाऐंगे’ या सुपरडुपर हिट चित्रपटात लाज-याबुज-या प्रीति सिंहची भूमिका साकारणारी बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी सध्या प्रचंड संतापली आहे. तिच्या या संतापाचे कारण आहे, सोशल मीडियावर होणारी ट्रोलिंग. ट्रोल करणा-या पुरूषांवर मंदिराने आपला सगळा राग काढला आहे. आता तो कसा, हे माहित करून घेण्यासाठी तुम्हाला अख्खी बातमी वाचावी लागेल.

होय, अलीकडे मंदिरा एका चॅट शोमध्ये पोहोचली. या शोदरम्यान बोलताना मंदिराने सोशल मीडियावर ट्रोल करणाºयांना चांगलेच फैलावर घेतले. ‘अनेकदा अनेक प्रसंगात लोकांनी मला जज केले. त्यावेळी लोक समोरा-समोर बोलले, म्हणून मी तिथल्या तिथेच त्यांना उत्तर दिले. पण आता सोशल मीडियावर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून एका गोष्टीची मला प्रकर्षाने जाणीव होतेय. ती म्हणजे, पुरूष भित्रे असतात. अनेक महिला मला त्यांची प्रेरणा मानतात. तर पुरुष माझ्या शरिरावरून अश्लिल बोलतात. आता मी सोशल मीडियावर ट्रोल करणाºयांकडे दुर्लक्ष करते. अनेकांच्या भाषेवरूनचं ते   कुठल्या वातावरणात लहानाचे मोठे झालेत, ते दिसून येते. महिलांनी चार भिंतीआडचं राहायला हवे, हे त्यांचे विचार त्यांच्या कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडवतात, ’ असे मंदिरा यावेळी म्हणाली.

ALSO READ : मंदिरा बेदीने बिकिनी फोटोशूट करून सोशल मीडियावर उडविली खळबळ! 

मंदिरा बेदी तिच्या बोल्ड आणि बिनधास्तपणासाठी ओळखली जाते. अनेकदा बोल्ड आणि बिकनीतील फोटोंमुळे ती ट्रोल होतांना दिसते. परंतु ट्रोल करणा-यांची पर्वा न करता, मंदिरा स्वत:चे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. मध्यंतरी मंदिराने फुकेटमध्ये बीचवर सनबाथ घेतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मंदिराचे स्टाइल स्टेटमेंट सर्वांत वेगळे आहे. मग तो इव्हेंट असो वा फंक्शन प्रत्येक ठिकाणी ती एका वेगळ्या अंदाजात बघावयास मिळते. मंदिरा ब-याचदा गौरव गुप्ताने डिझाइन केलेला ड्रेस परिधान करणे पसंत करते. 

Web Title: Bhadkali temple on the trollers Bedi, men decide Bhiktre !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.