...या सेलेब्सनी हटके पद्धतीने केला इन्स्टाग्राम डेब्यू!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2017 17:44 IST2017-06-06T12:11:52+5:302017-06-06T17:44:22+5:30
सोशल मीडियाच्या जमान्यात आपल्या फेव्हरेट स्टार्सच्या घडामोडींची खबरबात ठेवणे सहज शक्य होते. कारण हे सेलिब्रिटी आपल्या सोशल अकाउंटवरून त्यांच्या ...

...या सेलेब्सनी हटके पद्धतीने केला इन्स्टाग्राम डेब्यू!!
अनुष्का शर्मा
अभिनेत्री अनुष्का शर्मा ही २०१३ मध्येच इन्स्टावर सक्रिय झाली आहे. इन्स्टा डेब्यू करताना अनुष्काने एक वेगळीच शक्कल लढविली होती. अनुष्काने पहिलाच असा काही फोटो शेअर केला होता, ज्यामुळे तिच्या चाहत्यांच्या मनात ‘पहचान कौन’ असा प्रश्न निर्माण झाला होता. फोटोमध्ये अनुष्काचा चेहरा नव्हे तर केवळ पाय दिसत होते. या पावलाच्या फोटोनेच अनुष्काने इन्स्टाग्रामवर पाऊल ठेवले होते.
अभिषेक बच्चन
अभिषेक बच्चन याने फेब्रुवारी २०१२ मध्ये इन्स्टाग्रामवर डेब्यू केला होता. अभिषेकचा हा डेब्यू खूपच मजेशीर होता. कारण त्याने फोटोमध्ये स्वत:चा नव्हे तर कृष्णा अभिषेक याचा फोटो अपलोड केला होता. ज्यामुळे अभिषेकचे चाहते गोंधळात पडले होते. नंतर याविषयीचा उलगडा झाला.
रणवीर सिंग
रणवीरनेही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा फोटो अपलोड करून इन्स्टावर डेब्यू केला होता. त्याने करिअरच्या सुरुवातीचा एक फोटो इन्स्टावर शेअर केला होता. फोटोमध्ये रणवीर कॅमेºयाला फेस करताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये रणवीरने लिहिले होते की, ‘फॉर इएस आॅफ रणवीर सिंग.’
प्रियंका चोपडा
प्रियंकाने जून २०१२ मध्ये इन्स्टाग्रामवर डेब्यू केला होता. डेब्यू करताना प्रियंकाने लिहिले होते की, ‘मी खूपच आनंदी आहे.’ मात्र आपल्या इन्स्टा डेब्यूमध्ये एवढा बोअरिंग फोटो अपलोड करण्याचा प्रियंकाला आजही पश्चाताप होतो.
शाहरूख खान
इन्स्टाग्रामला घाबरणाºया व्यक्तींमध्ये बॉलिवूडचा किंग शाहरूख खानचाही समावेश आहे. त्यामुळेच त्याने या प्लॅटफॉर्मवर घाबरतच एंट्री केली होती. आॅक्टोबर २०१३ मध्ये डेब्यू करणाºया शाहरूखने फोटोही काहीसा तणावातला अपलोड केला होता. कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘पहिल्यांदाच इन्स्टाग्राम यूज करत आहे.’
अमिताभ बच्चन
महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियाच्या सर्वच फॉरमॅटमध्ये प्रचंड सक्रिय आहेत. इन्स्टावरदेखील ते नियमितपणे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. बिग बीने मार्च २०१३ मध्ये इन्स्टा अकाउंटला सुरुवात केली होती. सातपुड्याच्या टेकड्यांवर फिरतानाचा एक फोटो बिग बीने शेअर केला होता. फोटोमध्ये त्यांचे हावभाव एका लहान मुलांप्रमाणे होते.
दीपिका पादुकोण
बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही डंका वाजविणाºया अभिनेत्री दीपिका पादुकोण ही सप्टेंबर २०१३ मध्ये इन्स्टाग्रामवर सक्रिय झाली होती. त्यावेळी दीपिकाने एक कोलाज फोटो शेअर केला होता. फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, ‘लिमिटेड एडीशन.’
परिणिती चोपडा
बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री परिणिती चोपडा हिने २०१४ मध्ये आपल्या वाढदिवशी म्हणजे २२ आॅक्टोबर रोजी इन्स्टाग्रामवर सुरुवात केली होती. यावेळी तिने तिच्या मित्र आणि चाहत्यांबरोबर काढलेल्या बºयाचशा फोटोंचा एक कोलाज बनवून पोस्ट केला होता. परिणितीचा हा हटके डेब्यू सगळ्यांनाच आवडला होता.
करण जोहर
बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक करण जोहर याने जून २०१४ रोजी इन्स्टाग्रामवर पाऊल ठेवले होते. यावेळी त्याने एका झाडाचा फोटो शेअर केला होता. या फोटोला त्याने ‘आयुष्याचा ट्री’ असे संबोधले होते. हा फोटो खूपच रहस्यमयी आणि सुंदर होता.