आशिकी चित्रपटातून पदार्पण करुन आता बॉलीवुडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी ...
श्रद्धा म्हणतीये ओके जानु
/> आशिकी चित्रपटातून पदार्पण करुन आता बॉलीवुडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी श्रद्धा कपुर पाहता पाहता सर्वांचीच लाडकी झाली आहे. श्रद्धाचा टायगर श्रॉफ सोबत बागी हा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार असुन तिचे सर्व चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतू आता श्रद्धा कोणाला तरी ओके जानु असे म्हणत आहे. ती कोणाला ओके जानु म्हणतीये असे वाटत असेल तर जरा थांबा ती ओके जानु म्हणतीये खरी पण कोणत्या मुलाला नाही तर श्रद्धाचा नवीन चित्रपट ओके जानु येणार आहे. आणि तिने या चित्रपटाच्या शुटिंगला देखील सुरुवात केली आहे. सोशल साईटच्या माध्यामातून खुद्द श्रद्धानेच हीच माहिती दिली आहे. श्रद्धाचा हा ओके जानु नक्की कोण असणार आहे हे आपल्याला लवकरच समजेल. तोपर्यंत आपण श्रद्धाला तिच्या ओके जानु साठी शुभेच्छा देऊयात