​ ‘बेगम जान’चे ‘ओ रे कहारो...’ गाणे तुम्ही ऐकलेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2017 10:56 IST2017-04-05T05:26:04+5:302017-04-05T10:56:42+5:30

‘बेगम जान’ या चित्रपटाचे आणखी एक नवे गाणे रिलीज झाले आहे. ‘ओ रे कहारो...’ असे या गाण्याचे बोल आहेत.

'Begum Jan''s 'Oh Ray Kaharo ...' did you hear the song? | ​ ‘बेगम जान’चे ‘ओ रे कहारो...’ गाणे तुम्ही ऐकलेत?

​ ‘बेगम जान’चे ‘ओ रे कहारो...’ गाणे तुम्ही ऐकलेत?

द्या बालनच्या ‘बेगम जान’ या चित्रपटातील दोन हृदयस्पर्शी गाणी आपण ऐकलीत. ‘प्रेम मे तोहरे’ आणि ‘आझादियां’ अशी ही दोन्ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली आहेत. ‘प्रेम मे तोहरे’ या गाण्याला बॉलिवूडच्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी शब्दसूरांचा साज चढवला आहे. आता या चित्रपटाचे आणखी एक नवे गाणे रिलीज झाले आहे. ‘ओ रे कहारो...’ असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात विद्याचा आणखी एक नवा अंदाज पाहायला मिळतो आहे. कुंटणखाण्यावरच्या महिलांसोबत वागताना विद्या कमालीची निष्ठूर होते.  या महिलांमध्ये वेगळा आत्मविश्वास निर्माण व्हावा, हा यामागचा तिचा उद्देश आहे.



कुंटणखाण्यात राहणाºया महिलांना कशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते याचे उत्तम चित्रण या गाण्यात केले आहे. कौसर मुनीरचे बोल  आणि अनु मलिकचे संगीत असलेल्या या गाण्याला कल्पना पतोवरी आणि अल्तामश फरिदी यांनी आवाज दिला आहे.

ALSO READ : don't miss : पाहा, आशादींच्या सूरांनी सजलेले ‘बेगम जान’चे गाणे!

श्रीजीत मुखर्जी दिग्दर्शित हा सिनेमा राष्ट्रीय पुरस्कार विजेता  ‘राजकाहिनी’ या बंगाली सिनेमाचे हिंदी रिमेक आहे.   या सिनेमात विद्यासोबतच इला अरुण, गौहर खान, आशिष विद्यार्थी, रजित कपूर आणि नसिरुद्दीन शहा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत. श्रीजीत मुखर्जी या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करत आहेत. हा चित्रपट इंडस्ट्रीत एक नवा अध्याय निर्माण करेल, असे श्रीजीत यांनी म्हटले आहे.‘बेगम जान’ या चित्रपटात विद्याने एक करारी भूमिका साकारली आहे. विद्याचा हाच करारीपणा या गाण्यात पाहायला मिळतो आहे. या सिनेमात विद्याशिवाय अजून, ११ अभिनेत्रींचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. विद्याने या सिनेमात कुंटणखान्याच्या मालकिणीची व्यक्तिरेखा साकारली आहे.

Web Title: 'Begum Jan''s 'Oh Ray Kaharo ...' did you hear the song?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.