शान या चित्रपटात सुरुवातीला हे कलाकार करणार होते काम...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2016 17:11 IST2016-12-12T16:24:58+5:302016-12-12T17:11:40+5:30
शान या चित्रपटाला प्रदर्शित होऊन नुकतीच 36 वर्षं पूर्ण झाली. या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रचंड गाजल्या होत्या. आपण जाणून ...
.jpg)
शान या चित्रपटात सुरुवातीला हे कलाकार करणार होते काम...
श न या चित्रपटाला प्रदर्शित होऊन नुकतीच 36 वर्षं पूर्ण झाली. या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रचंड गाजल्या होत्या. आपण जाणून घेऊन शानबद्दलच्या काही गोष्टी...
शान या चित्रपटात सुनील दत्त, अमिताभ बच्चन, शशी कपूर, शत्रुघ्न सिन्हा, राखी, परबीन भाभी, बिंद्या गोस्वामी, कुलभूषण खरबंदा आणि मजहर खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटात मजहर यांनी साकारलेल्या अब्दुलच्या भूमिकेसाठी पहिल्यांदा संजीव कुमार यांना विचारण्यात आले होते. पण त्यांनी या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. तर या चित्रपटात धर्मेंद्र आणि हेमा मालिनीदेखील होते. रमेश सिप्पींसोबत काही वाद झाल्याने त्या दोघांनी हा चित्रपट सोडला तर शत्रुघ्न सिन्हाने साकारलेली भूमिका विनोद खन्ना साकारणार होता. पण विनोद ओशोच्या आश्रमात अचानक निघून गेल्यामुळे शत्रुघ्नने विनोदची जागा घेतली.
![shaan movie]()
शान या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी एक भव्य सेट गोरेगावमधील फिल्मसिटीमध्ये बनवण्यात आलेला होता. हा सेट बनवायला 8 लाख रुपये इतका खर्च झाला होता. त्या काळात ही रक्कम खूपच मोठी होती.
![Amitabh Bachchan and Parveen Babi in Shaan]()
या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या कुलभूषण खरवंदा याने खरा भाव खाल्ला होता. या भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कारदेखील मिळाला होता.
![Kulbhushan Kharbanda as Shakaal]()
कुलभूषणने रंगवलेली शाकाल ही भूमिका खूपच गाजली होती. मेरा नाम शाकाल हा त्याचा संवाद आणि त्याची वेशभूषा तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती.
![Kulbhushan Kharbanda in Shaan]()
यम्मा यम्मा, प्यार करने वाले ही या चित्रपटातील गाणी प्रचंड गाजली होती. पण इतके असूनही या चित्रपटाला म्हणावा तसा बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवता आला नव्हता. रमेश सिप्पींच्या शोले इतका हा चित्रपट चांगला नाही असे रसिकांचे म्हणणे होते.
![parveen babi in Pyaar Karne Waale song]()
शानला 25 वर्षं झाल्याच्या निमित्ताने एप्रिल 2005मध्ये हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला होता.
![Amitabh Bachchan and Rakhee in shaan]()