मर्द बनो : संजय दत्तचा रणबीरला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2016 11:41 IST2016-12-02T11:40:13+5:302016-12-02T11:41:53+5:30

संजूबाबा आपले विचार बेधडक बोलून दाखवतो. तो मनात वगैरे काही ठेवत नाही. कौतुक असेल तर कौतुक किंवा आवडले नाही ...

Become a Man: Ranjeet Rally for Sanjay Dutt | मर्द बनो : संजय दत्तचा रणबीरला सल्ला

मर्द बनो : संजय दत्तचा रणबीरला सल्ला

जूबाबा आपले विचार बेधडक बोलून दाखवतो. तो मनात वगैरे काही ठेवत नाही. कौतुक असेल तर कौतुक किंवा आवडले नाही तर तसे थेट तोंडावर सांगण्याचा त्याचा स्वभाव आहे. त्याच्या अशा स्पष्टोक्तेपणाचा प्रत्यय ‘ऐ दिल...’ स्टार रणबीर कपूरला आला.

रणबीर कपूर जो संजय दत्तच्या जीवनावर आधारित सिनेमात त्याचा रोल करतोय, त्याला संजूने ‘मर्द बनण्याचा’ सल्ला दिला आहे. त्याच्या घरी झालेल्या एका पार्टीमध्ये संजयने रणबीरला जवळ बसवून आपली नाराजी बोलून दाखवली. तू खूप सॉफ्ट रोल करतोस. तू जरा अ‍ॅक्शन आणि मर्दानी भूमिका करायला पाहिजे, असे त्याचे म्हणने पडले.

यावेळी डेविड धवन आणि राजकुमार हिराणीदेखील उपस्थित होते. हिराणी संजय दत्त बायोपिक दिग्दर्शित करीत आहे. भूमिकेसाठी तयारी म्हणून संजय स्वत: रणबीरला ट्रेन करतोय. रणबीरचा स्वभाव आणि व्यक्तीमत्त्व त्याच्यासारखे नसल्यामुळे संजय थोडासा चिंतीत आहे.

त्याच्या मते, रणबीरने अक्षय कुमार आणि सलमान खानप्रमाणे फुल अ‍ॅक्शन चित्रपट करावेत. केवळ रोमॅण्टिक भूमिका करू नये. एक अ‍ॅक्टर आणि माणूस म्हणून विविध प्रकारच्या भूमिका स्वीकारण्याचे धाडस त्याने दाखवावे.


मै हु खलनायक : रणबीर कपूर आणि संजय दत्त

आता ‘चॉकलेट हीरो’ रणबीरला संजूबाबाचे हे खडे बोल चांगलेच जिव्हारी लागले असणार. सुत्रांनुसार, ‘माचो रोल’ का करत नाही म्हणून संजूने त्याला बराच वेळ सुनावले. आता त्याच्या सल्ल्याचा रणबीरवर काही परिणाम होतो का?

कारण संजय दत्त एक सिनियर अ‍ॅक्टर आहे आणि नक्कीच रणबीरपेक्षा जास्त अनुभव आहे. मग त्याच्या सूचनेचा गांभीर्याने विचार केलाच पाहिजे.

cnxoldfiles/a>. ती पूर्ण करून तो संजय दत्त बायोपिक  हाती घेणार आहे.

Web Title: Become a Man: Ranjeet Rally for Sanjay Dutt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.