तर 'या' कारणामुळे 'कयामत से कयामत तक' चित्रपट रिलीज होण्याआधी घाबरली होती जुही चावला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 13:16 IST2017-10-04T07:46:14+5:302017-10-04T13:16:14+5:30

बॉलिवूडमधला 90चा दशक अभिनेत्री जुही चावलाने चांगलाच गाजवला.जुहीने आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले.1988मध्ये आलेल्या 'कयामत से कयामत तक' ...

But because of this reason, 'Priyanka to Karamat Tak' was afraid before the release of the movie, Juhi Chawla! | तर 'या' कारणामुळे 'कयामत से कयामत तक' चित्रपट रिलीज होण्याआधी घाबरली होती जुही चावला !

तर 'या' कारणामुळे 'कयामत से कयामत तक' चित्रपट रिलीज होण्याआधी घाबरली होती जुही चावला !

लिवूडमधला 90चा दशक अभिनेत्री जुही चावलाने चांगलाच गाजवला.जुहीने आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले.1988मध्ये आलेल्या 'कयामत से कयामत तक' चित्रपटातून जुहीने बॉलिवूडमध्ये आपली नवी ओळख निर्माण केली. जुहीने याआधी दोन चित्रपटात काम केले होते. मात्र अभिनेत्री म्हणून तिला लोक कयामत से कयामत तक चित्रपटानंतर ओळखायला लागले. एका इंटरव्ह्यु दरम्यान जुहीने सांगितले, जेव्हा नासिर हुसैन तिच्याकडे चित्रपटाची ऑफर घेऊन आले होते तेव्हा तिने लगेच होकार दिला होता. याबद्दल जेव्हा तिने इतर लोकांना सांगितले तेव्हा अनेकांनी तिला असे वाटले आपण होकार देऊन चूक केली आहे. कारण नासिरचे तीन चित्रपट लागोपाट फ्लॉप झाले होते. ज्यामुळे लोकांनी जुहीला हा चित्रपट साईन काम करण्यापासून थांबवले होते. या इंटरव्ह्यु दरम्यान ती पुढे म्हणाली ज्यावेळी मी चित्रपटासाठी होकार दिला तेव्हा या गोष्टीची कल्पना मला नव्हती.यानंतर मी सगळ्या गोष्टी माझ्या नशीबावर सोडल्या. आता जे होईल ते होईल.    

ALSO READ : जुही चावलाने शाहरूख खानला बघताच म्हटले होते; ‘हा कोणत्या अ‍ॅँगलनी हिरो दिसतो’!!

जुही चावलाला शूटिंग दरम्यानच्या आठवणी आजही आठवतात. चित्रपटाने रिलीजनंतर बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकुळ घातला होता.  प्रेक्षकांना आमीर खान आणि जुही चावलाची जोडी प्रचंड आवडली होती. गजब का ये दिन आणि ऐ मेरे हमसफर सारखी गाणी फॅन्सच्या आजही ओठांवर आहेत. या इंटरव्ह्यु दरम्यान जेव्हा जुहीला विचारण्यात आले की तू कोणत्या अभिनेत्यासोबत लग्न का नाही केलेस ?, यावर ती म्हणाली, मला माझा पती अभिनेता असावा असे कधीच वाटत नव्हते. जुहीची नेहमीच इच्छा होती की तिच्या नवऱ्याचे दूर -दूर पर्यंत या इंटस्ट्रीशी काहीही नातं नसावे आणि याबाबत तिच्या नशीबाने ही तिला साथ दिली.    

कयामत से कयामतनंतर आमीर खान आणि जुही चावलाची जोडी प्रेक्षकांना आवडायला लागली होती. यानंतर अनेक चित्रपटात त्यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली. ‘इश्‍क’, ‘हम हैं राही प्‍यार के’, 'फिर भी दिल है हिंदुस्तानी' सारख्या सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले.  

Web Title: But because of this reason, 'Priyanka to Karamat Tak' was afraid before the release of the movie, Juhi Chawla!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.