बेबो म्हणते,‘ निवडक चित्रपटच करणार’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 03:24 IST2016-02-24T10:24:40+5:302016-02-24T03:24:40+5:30
बॉलीवूडमध्ये अभिनेता किंवा अभिनेत्रींचे लग्न झाले की, त्यांचे करिअर संपले असे समजले जाते. पण करिना कपूर खान मात्र म्हणते ...

बेबो म्हणते,‘ निवडक चित्रपटच करणार’
ॉलीवूडमध्ये अभिनेता किंवा अभिनेत्रींचे लग्न झाले की, त्यांचे करिअर संपले असे समजले जाते. पण करिना कपूर खान मात्र म्हणते की, ती लग्नानंतर जास्त ‘चुजी’ झाली. मुलाखतीत बोलताना ती म्हणते,‘ मी फारच चुजी बनले आहे. मी कुठलाही चित्रपट बॅक टू बॅक करत नाही. मी असुरक्षित नाही, मी मला वाटेल त्यावेळी सैफसोबत हॉलीडेवर जाते. मी कुठल्याही विशिष्ठ कॅम्पचा भाग नाही. मला फक्त चिल करायला आणि कम्फर्टेबल राहायला आवडते. मला जोपर्यंत स्क्रिप्ट आवडत नाही तोपर्यंत मी कुठलाच चित्रपट करत नाही. त्यामुळेच तर मी ‘उडता पंजाब’ करण्याचा निर्णय घेतला. ’ करिअरविषयी बोलताना ती म्हणते,‘ मी गाणे म्हणू शकत नाही. आणि चित्रपट निर्मिती करण्याचीही मला फार इच्छा नाही. पण मला माझे जीवनचरित्र लिहायला जरूर आवडेल.