‘डियर करण, तू चुकीचा संदेश देतो आहेस’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 17:16 IST2017-01-10T17:16:38+5:302017-01-10T17:16:38+5:30

दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर  सध्या त्याच्या ‘अ‍ॅन अनस्युटेबल बॉय’ हे आत्मचरित्रामुळे चर्चेत आहे. या आत्मचरित्रात करणने प्रथमच त्याच्या ...

'Be careful, you give the wrong message' | ‘डियर करण, तू चुकीचा संदेश देतो आहेस’

‘डियर करण, तू चुकीचा संदेश देतो आहेस’

ग्दर्शक आणि निर्माता करण जोहर  सध्या त्याच्या ‘अ‍ॅन अनस्युटेबल बॉय’ हे आत्मचरित्रामुळे चर्चेत आहे. या आत्मचरित्रात करणने प्रथमच त्याच्या सेक्सलाईफबाबत खुलासे केले आहेत. मी काय आहे, हे सगळेच जाणतात. मात्र मी नेहमीच या विषयावर बोलणे टाळले. कारण मी याबद्दल बोललो तर मला तुरुंगात टाकले जाईल, असे करणने यात लिहिले आहे. करणच्या या विधानावर एलजीबीटी कम्युनिटीच्या अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. या एका गोष्टीमुळे सोशल मीडियावर करणचा विरोध केला जात आहे. करण जोहरसारखी व्यक्ति सगळ्यांसमोर बोलण्याचे धैर्य दाखवू शकत नसेल, तर यामुळे घुसमट सहन करणाºयांचे काय होणार? असा सवाल एलजीबीटी कम्युनिटीतील अनेक सदस्यांनी केला आहे. करण या मुद्यावर बोलणे टाळत असेल. त्याला या विषयावर बोलण्यास संकोच वाटत असेल तर यामुळे ‘गे’ आणि ‘लेस्बियन’ कम्युनिटीकडे वेगळ्या दृष्टीने बघणा-या समाजाला आणखी जोर चढेल. करणने असे बोलणे म्हणजे स्वत:चे वेगळे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धडपडणा-या एलजीबीटी कम्युनिटीचे खच्चीकरण करणे आहे. करणच्या अशा बोलण्याने समाजात चुकीचा संदेश जाईल, असे   एलजीबीटी सदस्यांनी म्हटले आहे.

एलजीबीटी कम्युनिटीचे कार्यकर्ता पल्लव पाटणकर यांनी करणच्या या विधानावर सडकून टीका केली आहे. मी ‘गे’ आहे, म्हणून मी सगळ्यांसमोर येण्यास घाबरतोयं, असे एखाद्या दुर्गम खेड्यातील व्यक्तिने म्हटले तर ते आपण समजू शकतो. मात्र करण जोहरसारखी दिग्गज व्यक्ती असे म्हणत असेल तर माझ्यासाठी ते निराशाजनक आहे. त्याने तर संपूर्ण हिंमतीने समोर यायला हवे. करण जोहरचे विचार ऐकून तर हिमतीने समोर येणारेही तुरुंगात जाण्याच्या भीतीने मागे हटतील. करणने या विषयावर  उघडपणे बोलावे. यामुळे त्याला तुरुंगात जावे लागलेच तर आम्ही सगळे त्यांच्यासोबत तुरुंगात जाऊ, असे पल्लव म्हणाले.

आपल्या आत्मचरित्रात करण जोहर लिहितो, अनेक लोक माझ्या सेक्स लाईफबद्धल माहिती मिळविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण, याविषयी मला काही ओरडून सांगणे गरजेचे नाही. मी अशा देशात राहतो, जेथे मी काही गोष्टी सांगितल्यास मला तुरुंगात जावे लागू शकते. मी २६ वर्षांचा असताना व्हर्जिनिटी गमाविली. हे सांगताना मला अभिमान वाटत नाही. मी तेव्हा न्यूयॉर्कमध्ये होतो, माझा तो पहिला अनुभव होता. 

Web Title: 'Be careful, you give the wrong message'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.