B'Day Special​ : यामुळे सलग तीन दिवस रडली होती श्रद्धा कपूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2017 11:48 IST2017-03-03T06:18:20+5:302017-03-03T11:48:20+5:30

‘आशिकी’ गर्ल श्रद्धा कपूर हिचा आज(३ मार्च) वाढदिवस. वयाच्या २१ व्या वर्षी तिने ‘तीन पत्ती’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. मात्र तिला खरी ओळख दिली ती ‘आशिकी2’ या चित्रपटाने. यानंतर श्रद्धाने कधीच मागे वळून बघितले नाही. आज जाणून घेऊ या, श्रद्धाबद्दल काही खास गोष्टी...

B'Day Special: Shraddha Kapoor has rallied for three consecutive days. | B'Day Special​ : यामुळे सलग तीन दिवस रडली होती श्रद्धा कपूर!

B'Day Special​ : यामुळे सलग तीन दिवस रडली होती श्रद्धा कपूर!

ong>‘आशिकी’ गर्ल श्रद्धा कपूर हिचा आज(३ मार्च) वाढदिवस.  वयाच्या २१ व्या वर्षी तिने ‘तीन पत्ती’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. मात्र तिला खरी ओळख दिली ती ‘आशिकी2’ या चित्रपटाने. यानंतर श्रद्धाने कधीच मागे वळून बघितले नाही. आज जाणून घेऊ या, श्रद्धाबद्दल काही खास गोष्टी...



श्रद्धा अर्धी महाराष्ट्रीयन आहे आणि अर्धी पंजाबी. म्हणजेच, श्रद्धाचे वडील शक्ती कपूर हे पंजाबी आहेत तर आई शिवांगी ही महाराष्ट्रीयन.

अनेकांच्या मनात अनेक गोष्टींबद्दल भीती असते. श्रद्धा आकाशात चमकणाºया वीजेला प्रचंड घाबरते. हा तिचा सगळ्यात मोठा फोबिया आहे.



अनेकांना वाटते, श्रद्धाने ‘आशिकी2’द्वारे बॉलिवूड डेब्यू केला. पण त्याआधीही तिने दोन चित्रपट केलेत. यातला पहिला चित्रपट होता,‘तीन पत्ती’ आणि दुसरा होता ‘लव का दी एन्ड’. हे दोन्ही चित्रपट बॉक्सआॅफिसवर दणकून आपटले होते.

तीन पत्ती’ हा चित्रपट श्रद्धाला कसा मिळाला तर तिच्या फेसबुक प्रोफाईलवरून. होय, या चित्रपटाच्या निर्मात्या अंबिका हिंदुजा यांली फेसबुकवर श्रद्धाचे प्रोफाईल बघितले आणि त्या इतक्या प्रभावित झाल्यात की त्यांनी आपल्या या चित्रपटासाठी श्रद्धाला कास्ट करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटासाठी तिने शिक्षण अर्धवट सोडले.



‘आशिकी2’मध्ये काम करण्यासाठी श्रद्धाने यशराज बॅनरचा ‘औरंगजेब’ हा सिनेमा नाकारला होता. आजही यशराज बॅनर ही गोष्ट विसरू शकलेला नाही.



श्रद्धाला दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या ‘माय फ्रेन्ड पिंटो’ या चित्रपटातून काढून टाकले होते. तिच्याजागी कल्की कोच्लिन हिला घेतले गेले. श्रद्धाला या गोष्टीचे इतके वाईट वाटले होते की सलग तीन दिवस ती यामुळे रडली होती.



श्रद्धा कपूर हॉलिवूड स्टार जॉनी डेप याची जबरदस्त फॅन आहे. बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चनची ती मोठी चाहती आहे. पार्टी करायला श्रद्धाला खूप आवडतं. सामान्यत: श्रद्धा तिच्या आईवडिलांपासून काहीही लपवत नाही.पण आई-वडिल घरी नसल्याची संधी साधून ती मस्तपैकी पार्ट्या अरेंज करते. स्वत: श्रद्धाने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.

श्रद्धा कपूरला चहा पिण्याचे ‘व्यसन’ आहे. दिवसभरात ती अनेकदा चहा पिते. स्ट्रेस दूर करण्यास चहा तिला मदत करतो.






Web Title: B'Day Special: Shraddha Kapoor has rallied for three consecutive days.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.