​B'Day Girl : - तर कल्की कोच्लिन असती क्रिमिनल सायकॉलॉजिस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 14:05 IST2017-01-10T14:05:15+5:302017-01-10T14:05:15+5:30

आपल्या दमदार अ‍ॅक्टिंगने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री कल्की कोच्लिन हिचा आज(१० जानेवारी) ३३ वा वाढदिवस. कल्की केवळ एक गुणी ...

B'Day Girl: - So Kalki Kochlin is a Criminal Psychologist! | ​B'Day Girl : - तर कल्की कोच्लिन असती क्रिमिनल सायकॉलॉजिस्ट!

​B'Day Girl : - तर कल्की कोच्लिन असती क्रिमिनल सायकॉलॉजिस्ट!

ल्या दमदार अ‍ॅक्टिंगने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री कल्की कोच्लिन हिचा आज(१० जानेवारी) ३३ वा वाढदिवस. कल्की केवळ एक गुणी अभिनेत्रीच नाही तर एक लेखिका सुद्धा आहे. फ्रेंच वडील आणि भारतीय आई लाभलेल्या कल्कीचे आजोबा मॉरिस कोल्चिन हे आयफेल टॉवर आणि स्टॅच्यू आॅफ लिबर्टीचे चीफ इंजिनिअर होते. 

कल्की व तिचे फ्रेंच वडील

कल्कीला फ्रेंचशिवाय हिंदी, इंग्लिश आणि तामिळ भाषा येतात. सन २००९ मध्ये ‘देव डी’ या चित्रपटातून कल्किने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता.  कल्कीचे बॉलिवूड करिअर अनेक चढ-ऊतारांनी भरलेले राहिले. कल्किच्या करिअरची सुरुवात चांगली झाली. पण तिला म्हणावे तसे यश मिळवता आले नाही. केवळ एक को-अ‍ॅक्ट्रेस अशीच तिची ओळख झाली. कल्की एक अभिनेत्री नसती तर ती एक क्रिमिनल सायकॉलॉजिस्ट बनली असती. कारण अ‍ॅक्ट्रेस किंवा क्रिमिनल सायकॉलॉजिस्ट असे दोन पर्याय तिने करिअरसाठी निवडले होते.



‘देव डी’साठी कल्किला बेस्ट सपोर्टींग अ‍ॅक्ट्रेसचा फिल्मफेअर अवार्ड मिळाला. यानंतर ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’,‘ये जवानी है दीवानी’,‘माय फ्रेंड पिंटो’,‘शैतान’,‘शंघाई’,‘एक थी डायन’ अशा अनेक चित्रपटांत ती दिसली.



कल्कीचे खासगी आयुष्यही अनेक चढ-ऊतारांनी भरलेले राहिले. ३० एप्रिल २०११ रोजी ती ‘देव डी’चे दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत याच्यासोबत लग्नबंधनात अडकली. ‘देव डी’च्या शूटींगदरम्यान कल्की व अनुराग जवळ आलेत. अर्थात हे नाते फार काळ टिकू शकले नाही. दोन वर्षांत दोघेही परस्परांपासून वेगळे झालेत. हे अनुरागचे दुसरे तर कल्कीचे पहिले लग्न होते. १३ नोव्हेंबर २०१३ रोजी या दोघांनी एक निवेदन जारी करून विभक्त झाल्याची घोषणा केली होती. आम्ही दोघांनीही एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतलायं. अर्थात आम्ही घटस्फोट घेतलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

कल्की अतिशय खुल्या विचारांची आहे. अलीकडे एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत कल्कीने तिच्या सेक्स लाईफबद्दल खुलासा केला होता. तिशीनंतर सेक्स लाईफ शानदार राहिली. मी माझ्या शरिराबद्दल फार कमी वेळा संकोच करते. मी आता बेडवर अधिकच स्वार्थी झालेय, असे तिने या मुलाखतीत म्हटले होते.



कल्की लहानपणी लैंगिक शोषणाची बळी ठरली होती. तिने स्वत: ही कबुली दिली होती.  ९ वर्षांची असताना मी एका व्यक्तिला माझ्यासोबत सेक्स करण्याची परवानगी दिली होती. त्यावेळी मला त्याचा अर्थही कळत नव्हता. पण ही गोष्ट आईला कळली तर काय होणार, या भीतीने अनेक रात्री मी झोपले नव्हते. ही माझी चूक होती, असेच मला वाटत होते. त्यामुळे अनेक वर्षे ही गोष्ट मी माझ्या पालकांपासून लपवून ठेवली. पण त्या गोष्टीचा अर्थ मला कळला असता तर मी न घाबरता ती गोष्ट माझ्या आईला सांगू शकले असते. त्यामुळे प्रत्येक आई-वडिलांनी मुलांसमोर ‘सेक्स’ आणि ‘प्रायव्हेट पार्ट’ यासारख्या शब्दांना नि:संकोच वापर केला पाहिले. यामाध्यमातून लैंगिक शोषणापासून तुम्ही तुमच्या मुलाचे संरक्षण करू शकतात, असे तिने म्हटले होते.

Web Title: B'Day Girl: - So Kalki Kochlin is a Criminal Psychologist!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.