‘बीबीडी’ रिलीजवेळी लाँच होणार ‘एडीएचएम’ ट्रेलर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 10:28 IST2016-08-05T04:58:32+5:302016-08-05T10:28:32+5:30

 करण जोहर जवळपास चार वर्षांनंतर दिग्दर्शक म्हणून ‘ऐ दिल हैं मुश्किल’ हा चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाची चाहते ...

'BBD' trailer will be launched at the 'ADHM' trailer! | ‘बीबीडी’ रिलीजवेळी लाँच होणार ‘एडीएचएम’ ट्रेलर !

‘बीबीडी’ रिलीजवेळी लाँच होणार ‘एडीएचएम’ ट्रेलर !

 
रण जोहर जवळपास चार वर्षांनंतर दिग्दर्शक म्हणून ‘ऐ दिल हैं मुश्किल’ हा चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाची चाहते विशेष वाट पाहत होते. यावेळी करण जोहरसोबत रणबीर कपूर, फवाद खानसह अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या रॉय बच्चन हे दिसणार आहेत. ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटाचा संघर्ष अजय देवगणच्या ‘शिवाय’ सोबत दिवाळीच्या वेळेस बॉक्स आॅफीसवर होणार आहे.

तरीही अजयने शिवायचा ट्रेलर अद्याप सोशल मीडियापासून लांबच ठेवला आहे. या दोन्ही चित्रपटांची एकमेकांसोबत टक्कर झाल्यावरचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे.

सुत्रांनुसार,‘करणने असा प्लॅन केला आहे की, जेव्हा ‘बार बार देखो’ रिलीज होईल तेव्हा ‘ऐ दिल है मुश्किल’ चा  ट्रेलर रिलीज करायचा. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ यांच्या मु्ख्य भूमिकेतील ‘बार बार देखो’चित्रपट ९ सप्टेंबरला रिलीज होणार असून ८ सप्टेंबरला एडीएचएमचा ट्रेलर रिलीज होणार आहे. 

baar baar dekho

 

Web Title: 'BBD' trailer will be launched at the 'ADHM' trailer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.