सनी लिओनीने भारताबद्दल केले मोठे विधान, म्हणाली की, भारतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 03:48 PM2021-03-24T15:48:21+5:302021-03-24T15:48:41+5:30

ग बॉसच्या ५ व्या सीझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती. याच रियालिटी शोमुळे ती प्रकाशझोतात आली होती.

Barbie doll Sunny Leone prefers to stay in India, not America, but read why | सनी लिओनीने भारताबद्दल केले मोठे विधान, म्हणाली की, भारतात...

सनी लिओनीने भारताबद्दल केले मोठे विधान, म्हणाली की, भारतात...

googlenewsNext

सनी लिओनीने पॉर्न इंडस्ट्री सोडल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. सनी लिओनीचे कोट्यावधी चाहते आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात. नुकत्याच झालेल्या मुलाखतीत सनी लिओनीने मोठं वक्तव्य केले आहे. सनी पती आणि मुलांसमवेत मुंबईत राहते.  तरी कधीकधी ती तिच्या लॉस एंजेलिसच्या घरी देखील जाते, परंतु परदेशात राहण्यापेक्षा तिला भारतात राहणे अधिक पसंत असल्याचे तिने सांगितले.

 मुलाखती दरम्यान जेव्हा सनीला विचारले गेले की तुला परदेशात की भारतात कोठे राहायला आवडते, तेव्हा सनी लिओनीने याचं उत्तर मोठ्या खुबीने दिले आहे.  सनीचे उत्तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक सनीच्या भारताबद्दलच्या सकारात्मक विचारसरणीचे खूप कौतुक करत आहेत.

 सनी म्हणाली की, मला आता अमेरिकेत राहायचे नाही, मला तेथे नकारात्मक वातावरण वाटते. इथं भारतात एक वेगळंच वातावरण आहे.  मला भारतात राहिल्या जास्त आवडते.  प्रत्येक देशाच्या स्वतःच्या समस्या असतात, परंतु एकूणच, भारत एक विलक्षण देश आहे.

सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. बिग बॉसच्या ५ व्या सीझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती. याच रियालिटी शोमुळे ती प्रकाशझोतात आली होती. सनी लिओनी आपल्या बोल्ड अदांमुळे बॉलीवुडमध्ये यशाच्या शिखरावर पोहचली आहे. विविध सिनेमात सनी अनेक गाण्यांवर थिरकली आहे. सनीवर चित्रीत करण्यात आलेल्या आयटम नंबर्सना रसिकांचाही भरभरुन प्रतिसाद लाभला आहे.

Web Title: Barbie doll Sunny Leone prefers to stay in India, not America, but read why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.