​१४ वर्षांत प्रथमच सलमान खानच्या घरी येणार नाहीत बाप्पा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 10:11 IST2017-08-18T04:41:54+5:302017-08-18T10:11:54+5:30

गेल्या १४ वर्षांपासून दरवर्षी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गणपती बाप्पाचे जोरदार होते. सलमान मुंबईत असो वा नसो, गणपती बाप्पाच्या ...

Bappa will not go to Salman Khan's house for the first time in 14 years! | ​१४ वर्षांत प्रथमच सलमान खानच्या घरी येणार नाहीत बाप्पा !

​१४ वर्षांत प्रथमच सलमान खानच्या घरी येणार नाहीत बाप्पा !

ल्या १४ वर्षांपासून दरवर्षी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गणपती बाप्पाचे जोरदार होते. सलमान मुंबईत असो वा नसो, गणपती बाप्पाच्या स्वागतात कुठलीही कसर सोडली जात नाही. अर्थात यंदा मात्र गॅलेक्सीमध्ये बाप्पाचे आगमन होणार नाही. होय, भाईजानच्या घरी यावर्षी गणेश स्थापना होणार नाही. अरे, असे घाबरू नका. कारण खान कुटुंबात यंदा गणेशोत्सव साजरा होणार नाही, असे मुळीच नाही. प्रत्यक्षात यंदा खान कुटुंब बाप्पाला गॅलेक्सी अपार्टमेंटऐवजी अर्पिता खान शर्माच्या घरी स्थापित करणार आहे. गत १४ वर्षांत असे पहिल्यांदा होणार आहे.



गतवर्षी सलमान गणेशोत्सव साजरा करू शकला नव्हता. कारण तो ‘ट्यूबलाईट’च्या शूटींगमध्ये बिझी होता. पण यावर्षी सलमान धूमधडाक्यात बाप्पाचे स्वागत करणार आहे. त्यामुळे यंदा म्हणे त्याने ‘टायगर जिंदा है’च्या शूटींगमधून सुट्टी घेण्याचा निर्णयही घेतलाय. २५ आॅगस्टला तो घरी परतणार आहे. अबुधाबीवरून तो एका दिवसांसाठी भारतात येईल आणि दुसºया दिवशी परत शूटींगवर परतेल. सलमान सध्या ‘टायगर जिंदा है’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. यात चित्रपटात कॅटरिना कैफ त्याची हिरोईन आहे. या चित्रपटानंतर सलमान रेमो डिसूजाच्या चित्रपटाचे शूटींग सुरु करणार आहे. 

ALSO READ : सलमान खानमुळे निर्माण झाली अभिषेक बच्चनच्या आयुष्यात 'ही' नवी अडचण..वाचा सविस्तर

रेमोच्या या चित्रपटात सलमान एका १३ वर्षांच्या मुलीच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसणार आहे. पण केवळ वडिल नाही तर ट्रेन्ड डान्सर. म्हणजेच, या चित्रपटात सलमान कधी नव्हे ते धम्माल डान्स करताना दिसणार आहे. त्यामुळे   सलमान त्याची डान्सिंग स्किल वाढवताना दिसतो आहे. त्यासाठी तो खास हिप हॉप शिकतो आहे. हिप हॉपचे क्लासेस त्याने जॉईन केले आहेत.

Web Title: Bappa will not go to Salman Khan's house for the first time in 14 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.