बालिवूडकरांचा हॉलिवूडमध्येही जलवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2016 01:22 IST2016-02-14T08:22:42+5:302016-02-14T01:22:42+5:30
बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चेत आहे. अमेरिकन टीव्हीवरील ‘क्वांटिको’ या मालिकेतील भूमिकेसाठी ‘पीपल्स चॉईस’ पुरस्कार ...

बालिवूडकरांचा हॉलिवूडमध्येही जलवा
दीपिका पदुकोन
प्रियंका पाठोपाठ आता दीपिकाने देखील ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झेंडर कैज’ या अॅक्शन मुव्हिच्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. वीन डिझेलसोबतचे तिचे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. दीपिकाही बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडमध्येही मोठी पारी खेळेल असा विश्वास तिचे चाहते व्यक्त करीत आहेत.
इरफान खान
‘लाईफ आॅफ पाई, स्लमडॉग मिलेनियर आणि जुरासिक वर्ल्ड’ यासारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या इरफान खानचा हॉलिवूडमध्ये चांगलाच दबदबा आहे. येथे त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली असून अजूनही त्याला हॉलिवूडपटाच्या बºयाचशा आॅफर्स येत आहेत.
अनिल कपूर
इरफान बरोबरच स्लमडॉग मिलेनियरमध्ये प्रमुख भूमिका साकारलेल्या अनिल कपूरचे देखील हॉलिवूडमध्ये विशेष वलय आहे. ‘मिशन इम्पॉसिबल’ या अॅक्शनपटात अनिलने भूमिका साकारली आहे. शिवाय आगामी काळात देखील तो हॉलिवूडच्या काही चित्रपटांमध्ये झळकण्याची शक्यता आहे.
फ्रीडा पिंटो
स्लमडॉग मिलेनियर या आॅस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटाने आणखी एका अभिनेत्रीला हॉलिवूडचे दरवाजे उघडून दिले. स्लमडॉग मिलेनियरमध्ये झळकलेल्या फ्रीडा पिंटोने अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. ‘डेजर्ट डांसर, इमोर्टल्स’ या चित्रपटांमधील तिच्या भूमिका विशेष गाजल्या. शिवाय तिने हॉलिवूडच्या अनेक नामांकित पुरस्कार सोहळ्यांमध्ये देखील हजेरी लावली आहे.