बालिकावधू फेम सुरेखा सिक्री आहे नसिरुद्दीन शहा यांची मेहुणी, नसिरुद्दीन यांचे झाले होते पहिले लग्न, त्यांना आहे एक मुलगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 11:20 IST2018-07-25T11:17:31+5:302018-07-25T11:20:15+5:30

नसिरुद्धीन शहा यांनी मनारा सिक्री उर्फ परवीनसोबत लग्न केले होते. लग्नाच्या वेळी नसिरुद्धीन हे केवळ २० वर्षांचे होते तर त्यांची पत्नी ही तब्बल ३५ वर्षांची होती. मनारा या पाकिस्तानी वंशाच्या असून त्या प्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा सिक्री यांच्या बहीण होत्या.

Balika Vadhu fame Surekha Sikri is a sister in law of Naseeruddin Shah | बालिकावधू फेम सुरेखा सिक्री आहे नसिरुद्दीन शहा यांची मेहुणी, नसिरुद्दीन यांचे झाले होते पहिले लग्न, त्यांना आहे एक मुलगी

बालिकावधू फेम सुरेखा सिक्री आहे नसिरुद्दीन शहा यांची मेहुणी, नसिरुद्दीन यांचे झाले होते पहिले लग्न, त्यांना आहे एक मुलगी

नसिरुद्धीन शहा यांची पत्नी अभिनेत्री रत्ना पाठक असल्याचे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. ते दोघे पुरस्कार सोहळ्यात, अनेक समारंभात नेहमीच एकत्र हजेरी लावतात. पण तुम्हाला माहीत आहे का, रत्ना पाठक यांच्यासोबत लग्न करण्याआधी नसिरुद्धीन शहा यांचे लग्न झालेले होते आणि त्यांना एक मुलगी देखील आहे. नसिरुद्धीन यांनी वयाच्या २० व्या वर्षी लग्न केले होते आणि त्यांची पत्नी त्यांच्यापेक्षा तब्बल १५ वर्षांनी मोठी होती. लग्नाच्या काहीच महिन्यात त्या दोघांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला होता. 
नसिरुद्धीन शहा यांनी मनारा सिक्री उर्फ परवीनसोबत लग्न केले होते. लग्नाच्या वेळी नसिरुद्धीन हे केवळ २० वर्षांचे होते तर त्यांची पत्नी ही तब्बल ३५ वर्षांची होती. मनारा या पाकिस्तानी वंशाच्या असून त्या प्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा सिक्री यांच्या बहीण होत्या. सुरेखा सिक्री यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. बालिकावधू या मालिकेत त्यांनी दादी ही व्यक्तिरेखा साकारली होती. परवीन यांनी लग्नाच्या एक वर्षांच्या आतच मुलीला जन्म दिला. तिचे नाव हिबा असे ठेवण्यात आले. पण तिच्या जन्मानंतर काहीच महिन्यांत ते दोघे विभक्त झाले. घटस्फोट झाल्यानंतर हिबा मुलीला घेऊन लंडनला निघून गेल्या. अनेक वर्षं लंडनमध्ये राहिल्यानंतर त्या इराणमध्ये गेल्या. त्यामुळे हिबा इराणमध्येच लहानाची मोठी झाली. पण परवीन यांचे अचानक निधन झाल्यानंतर हिबा भारतात परतली आणि नसिर यांच्यासोबत राहू लागली. हिबा भारतात परत आली, त्यावेळी तिचे वय केवळ १४ वर्षं होते. त्यावेळी नसिर यांचे रत्ना पाठक यांच्यासोबत दुसरे लग्न देखील झाले होते. त्यामुळे हिबा रत्ना पाठक यांचा आई म्हणून स्वीकार करेल का असा प्रश्न त्यांना पडला होता. पण भारतात आल्यानंतर हिबा आणि रत्ना पाठक यांच्यात चांगलीच गट्टी जमली. रत्ना पाठक आणि नसिरुद्दीन शहा यांना विवान आणि इमाद अशी दोन मुले असून हे दोघेही चित्रपटांमध्ये काम करत आहेत. 

Web Title: Balika Vadhu fame Surekha Sikri is a sister in law of Naseeruddin Shah