/> भव्य-दिव्य सेट्स, तगडे कलाकार, एक से बढकर एक डायलॉग, अंगावर रोमांचे उभे राहतील अशा लढाया, अन गाणी-नृत्याची अलग लकब असलेला बाजीराव मस्तानी हा ऐतिहासिक सिनेमा पाहताना डोळ््याचे पारणे फिटल्याशिवाय राहत नाही. दिपिकाने साकारलेली मस्तानी तिच्या देहबोलीतून दिसुन येते तर बाजीरावचा अंदाज तो रुतबा-रुबाब दाखविताना रणवीर कुठेच कमी पडला नाही, प्रियांकाने साकारलेली घरंदाज काशीबाईची भुमिका देखील प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिली आहे. बाजीराव मस्तानी १८ डिसेंबर २०१५ रोजी प्रदर्शित झाला अन चित्रपटाने पाहता पाहता रेकॉर्डब्रेक कमाई केली. प्रेक्षकांनी या चित्रपटाला इतके प्रेम दिले कि या चित्रपटाने सर्वांची प्रशंसा तर मिळविलीच परंतू प्रत्येक पुरस्कार सोहळ््यांमध्ये अॅवॉर्ड पटकावून कलाकारांनी मोहोर उमटविली. आज बाजीराव मस्तानीला १०० दिवस पुर्ण होत असुन रणवीर याबद्दल खुपच प्राऊड फिल करीत आहे अन तो या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिल्याबद्दल त्यांचे आभार देखील मानत आहे.