'बजरंगी भाईजान'मधील मुन्नी आता कशी दिसते? ईदनिमित्त शेअर केलेला व्हिडिओ पाहून चाहतेही अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 11:46 AM2024-04-11T11:46:40+5:302024-04-11T11:47:48+5:30

'बजरंगी भाईजान'मधली मुन्नी आता मोठी झाली आहे. अभिनयाबरोबरच तिच्या क्यूटनेसनेही प्रेक्षक भारावून गेले होते.

bajarangi bhaijan fame harshali malhotra aka munni shared special video on eid | 'बजरंगी भाईजान'मधील मुन्नी आता कशी दिसते? ईदनिमित्त शेअर केलेला व्हिडिओ पाहून चाहतेही अवाक्

'बजरंगी भाईजान'मधील मुन्नी आता कशी दिसते? ईदनिमित्त शेअर केलेला व्हिडिओ पाहून चाहतेही अवाक्

२०१५ साली प्रदर्शित झालेला सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' सिनेमा प्रचंड गाजला. पाकिस्तानातून चुकून भारतात आलेल्या मुन्नीला पुन्हा तिच्या देशात सोडून तिची कुटुंबीयांची भेट घडवून देत बजरंगी भाईजान प्रेक्षकांची मनं जिंकतो. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या सिनेमात मुन्नी हे पात्र साकारलेल्या बालकलाकार हर्षाली मल्होत्रालाही लोकप्रियता मिळाली होती. 'बजरंगी भाईजान'मुळे हर्षाली प्रसिद्धीझोतात आली होती. निरागस अभिनयाने तिने प्रेक्षकांनी मनं जिंकून घेतली होती. 

हर्षालीच्या अभिनयाबरोबरच तिच्या क्यूटनेसनेही प्रेक्षक भारावून गेले होते. 'बजरंगी भाईजान'मधली मुन्नी आता मोठी झाली आहे. मुन्नीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली हर्षाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. हर्षालीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने ईदच्या शुभेच्छा चाहत्यांना दिल्या आहेत. या व्हिडिओत तिने भरजरी ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे. बिंदी लावून तिने खास लूकही केला आहे. देखो चांद आया असं म्हणत हर्षालीने चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

हर्षालीच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. दरम्यान, हर्षाली सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतं. इन्स्टाग्रामवरही तिचं फॅन फॉलोविंग प्रचंड आहे. हर्षालीचे इन्स्टावर ३.४ मिलियन फॉलोवर्स आहेत. 

Web Title: bajarangi bhaijan fame harshali malhotra aka munni shared special video on eid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.