टीमवर्कमुळेच बाहुबली यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 02:22 IST2016-01-16T01:17:06+5:302016-02-13T02:22:29+5:30
पण, त्याने या यशाची हवा डोक्यात जावू दिली नाही. या चित्रपटाला यश मिळाले. मात्र, कोणत्याही चित्रपटाचे यश हे केवळ ...

टीमवर्कमुळेच बाहुबली यशस्वी
प , त्याने या यशाची हवा डोक्यात जावू दिली नाही. या चित्रपटाला यश मिळाले. मात्र, कोणत्याही चित्रपटाचे यश हे केवळ अभिनेत्यांवर अवलंबून नसते, तर ते संपूर्ण टीमचे यश असते, असे प्रभास याने म्हटले आहे. फक्त एक स्टार चित्रपटाला अत्युच्च शिखरावर घेऊन जाऊ शकत नाही. कारण, अभिनयाबरोबरच व्हिजुअल्स देखील तितकेच महत्त्वाचे असतात. चित्रपटाचा भाग बनलेल्या प्रत्येक व्यक्तीचे त्या यशामागे श्रम असतात. ते टीममुळेच शक्य झालेले असते. त्यामुळे केवळ स्टारमुळे चित्रपटाचे यश मोजता येत नाही, असे एका मुलाखतीत प्रभासने सांगितले. सवरेत्तम चित्रपट तयार करणे खरं तर एक चॅलेंज असते. चित्रपट थिएटरपर्यंत पोचेपर्यंत खूप गोष्टी कराव्या लागतात. सुदैवाने बाहुबलीच्या रिलीजसाठी आम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागला नाही. योग्य नियोजन आणि टीम वर्कमुळे चित्रपट प्रेक्षकांनीच सर्वाेत्तम बनविला, हेही प्रभासने नम्रपणे मान्य केले.