सर्वांसाठी खुला झाला ‘बाहुबली’ माहिष्मतीचा सेट! पाहा, फोटो!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2017 14:00 IST2017-10-15T08:30:51+5:302017-10-15T14:00:51+5:30
‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली2’ या चित्रपटांनी इतिहास रचला. विशेषत: ‘बाहुबली2’ने हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कधी नव्हे इतके मोठे यश मिळवले. अभिनेता ...
सर्वांसाठी खुला झाला ‘बाहुबली’ माहिष्मतीचा सेट! पाहा, फोटो!!
‘ ाहुबली’ आणि ‘बाहुबली2’ या चित्रपटांनी इतिहास रचला. विशेषत: ‘बाहुबली2’ने हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कधी नव्हे इतके मोठे यश मिळवले.
अभिनेता प्रभास आणि राणा दुग्गुबत्ती यांच्या ‘बाहुबली2’ने बॉक्स आॅफिसवरील जवळपास सर्व रेकॉर्डवर आपले नाव कोरले. गेल्या काही महिन्यांचा काळाचा विचार केल्यास एकाही चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर शंभर दिवस पूर्ण करता आले नाहीत. परंतु एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली2’ने बॉक्स आॅफिसवर शंभर दिवस पूर्ण करीत इतिहास रचला. हा रेकॉर्ड रचताना ‘बाहुबली2’ने दिग्गज सेलिब्रिटींच्या चित्रपटांचा सामना केला. त्यामध्ये सलमान खान याच्या ‘ट्यूबलाइट’, अर्जुन कपूरच्या ‘मुबारका’ आणि शाहरूख खानचा नुकताच रिलीज झालेला ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटांचा समावेश आहे. ‘बाहुबली2’चा प्रभाव एवढा होता की, प्रेक्षकांनी इतर चित्रपटांना फारसा थारा न देता ‘बाहुबली2’ला पसंती दिली.
येणारी अनेक वर्षे हा चित्रपट सिनेप्रेमींच्या मनात जिवंत राहणार आहे. आता तर या चित्रपटासाठी उभारण्यात आलेला भव्यदिव्य सेट सुद्धा तुम्ही बघू शकणार आहात.
![]()
![]()
होय, रामोजी फिल्म सिटीने ‘बाहुबली’च्या माहिष्मती साम्राज्याशिवाय अनेक दुसरे चित्रपटाचे सेट लोकांसाठी खुले गेले आहेत.
![]()
![]()
पाचशे लोकांनी ५० दिवस दिवस-रात्र जागून हा भव्य दिव्य सेट साकारला होता. २८ कोटी रुपए खर्चून तो उभारण्यात आला होता.
![]()
![]()
‘बाहुबली’साठी साकारण्यात आलेल्या याच सेटमध्ये काही नवे इलिमेंट्स जोडून याठिकाणी ‘बाहुबली2’च्या अनेक दृश्यांचे शूटींग झाले होते. याशिवाय एक नवा सेटही तयार करण्यात आला होता. यासाठी ३५ कोटी खर्च आला होता. हाच भव्यदिव्य सेट आता ‘याचि देही याचि डोळा’ पाहता येणार आहे.
![]()
![]()
ALSO READ: Just for Women !! OMG !! इतकी बदलली राजमाता शिवगामी देवी?
सुमारे २ हजार एकरमध्ये पसरलेल्या रामोजी फिल्मसिटीत आत्तापर्यंत सुमारे अडीच हजार चित्रपटांचे शूटींग झाले आहे. यापैकी काही निवडक चित्रपटांचे नाव घ्यायचे झाल्यास, ‘चेन्नई एक्स्प्रेस’,‘द डर्टी पिक्चर’,‘बाहुबली’ अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. रामोजी फिल्मसिटीत ५०० पेक्षा अधिक सेट लोकेशन आहे. वर्षांला सुमारे २०० चित्रपटांचे शूटींग येथे होते. शेकडो गार्डन, ५० पेक्षा अधिक स्टुडिओ फ्लोर, आॅथराईज्ड सेट, आऊटडोअर लोकेशन सगळे काही येथे आहे.