करणच्या पार्टीत प्रभास बनला ‘बाहुबली’ अन् वरूण धवन बनला ‘कटप्पा’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2017 12:32 IST2017-06-20T07:01:22+5:302017-06-20T12:32:04+5:30
कालच्या करणच्या पार्टीत ‘बाहुबली’ प्रभास हजर होता.ऐरवी लाजरा बुजरा प्रभासही या पार्टीत चांगलाच खुलला. बॉलिवूडच्या यंग ब्रिगेडसोबत प्रभासने मनसोक्त मस्ती केली.

करणच्या पार्टीत प्रभास बनला ‘बाहुबली’ अन् वरूण धवन बनला ‘कटप्पा’!
क ण जोहर म्हणजे फुल टू पार्टी मॅन. करणच्या घरी काही ना काही कारणावरून सर्रास पार्ट्या होतात. अख्खे बी-टाऊन या पार्टीला हजर राहते. काल रात्रीही करणच्या घरी अशीच एक पार्टी रंगली. आता या पार्टीचे कारण आम्हाला ठाऊक नाही. पण कालची ही पार्टी खास होती, हे मात्र आम्ही तुम्हाला आधीच सांगितले आहे. होय, कालच्या करणच्या पार्टीत ‘बाहुबली’ प्रभास हजर होता. आता प्रभास पार्टी असल्यावर पार्टी तर खास होणारच ना. बॉलिवूडचे सगळे यंग स्टार्सही या पार्टीला हजर होते. रणबीर कपूर, अर्जून कपूर, वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्ट असे सगळेच. मग काय, पार्टी चांगलीच रंगात आली. ऐरवी लाजरा बुजरा प्रभासही या पार्टीत चांगलाच खुलला. बॉलिवूडच्या यंग ब्रिगेडसोबत प्रभासने मनसोक्त मस्ती केली. विश्वास बसत नसेल तर हा एक फोटो पाहा. यात वरूण धवन आणि प्रभास अशीच धम्माल मस्ती करताना दिसत आहेत. दोघांनीही ‘बाहुबली’तील एक सीन रिक्रिएट केलाय. कटप्पाने ज्याप्रमाणे बाहुबलीला मारले, अगदी त्याचप्रमाणे वरूण प्रभासला तलवारीने मारताना दिसतोय. हा फोटो पाहून तुमच्या चेहºयावर नक्की हसू येईल, याचा आम्हाला विश्वास आहे.
प्रभास लवकरच ‘साहो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा बजेट तब्बल १५० कोटी रुपयांचा असल्याचे कळतेय. या वर्षा अखेरपर्यंत प्रदर्शित होणारा हा चित्रपट तीन भाषांत प्रदर्शित होणार आहे. येत्या काळात प्रभास बॉलिवूड डेब्यू करणार अशीही चर्चा सध्या रंगते आहे. करण जोहरसह रोहित शेट्टी प्रभासला घेऊन चित्रपट काढण्यात उत्सूक असल्याची बातमी कालपरवाच आली. अर्थात रोहितने असे काहीही नसल्याचे स्पष्ट केले आहे.