‘बाहुबली’ प्रभास झाला हळवा, राजमौलींना लिहिले भावनिक पत्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2017 10:21 IST2017-07-11T04:42:42+5:302017-07-11T10:21:28+5:30
‘बाहुबली’ व ‘बाहुबली2’च्या अभूतपूर्व यशानंतर साऊथ स्टार प्रभास भारतीय सिनेमातील तळपता तारा बनला आहे. भारतीय सिनेमाच्या इतिहासात असे यश ...

‘बाहुबली’ प्रभास झाला हळवा, राजमौलींना लिहिले भावनिक पत्र!
‘ ाहुबली’ व ‘बाहुबली2’च्या अभूतपूर्व यशानंतर साऊथ स्टार प्रभास भारतीय सिनेमातील तळपता तारा बनला आहे. भारतीय सिनेमाच्या इतिहासात असे यश फार कमी लोकांच्या वाट्याला येते. भारतीय सिनेमातील प्रत्येक अभिनेत्री, प्रत्येक दिग्दर्शक आणि प्रत्येक बडा निर्माता याघडीला प्रभाससोबत काम करू इच्छितो. देश-विदेशातील कोट्यवधी चाहते प्रभासवर आपला जीव ओवाळून टाकायला तयार आहेत. प्रभास या प्रेमाने, या यशाने गदगद झाला आहे. निश्चितपणे याचे सर्वांत मोठे श्रेय जाते ते ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एसएस राजमौली यांना. राजमौली यांनीच चित्रपटातील लीड भूमिकेसाठी प्रभासची निवड केली होती. आज ‘बाहुबली’ला दोन वर्षे पूर्ण झालेत. याच मुहूर्तावर प्रभासने फेसबुकवर राजमौली यांना एक पत्र लिहिले आहे. यात प्रभासने आपल्या मनातील प्रेम, आदर व्यक्त केला आहे. प्रभास लिहितो, ‘आज माझ्या आयुष्यातील सर्वाधिक खास चित्रपट प्रदर्शित होऊन दोन वर्षे झालीत. ‘बाहुबली: दी बिगनिंग’मध्ये माझ्यासकट अख्ख्या टीमने अतिशय समर्पणाने काम केले होते. मी माझ्या चाहत्यांचाही आभारी आहे, ज्यांनी मला एक क्षणही स्वत:पासून वेगळे केले नाही. बाहुबली टीमला खूप खूप शुभेच्छा. विशेषत: या सगळ्यांमागे असलेली व्यक्ती म्हणजे, राजमौली यांचेही आभार. आम्ही सगळे आपल्यासोबत आहोत.’
![]()
ALSO READ : रणबीर कपूर ‘या’ कारणामुळे बनला ‘बाहुबली’ प्रभासचा डायहार्ड फॅन!
प्रभासच्या या भावनिक पत्रावर तूर्तास राजमौली यांनी उत्तर दिलेले नाही. पण प्रभासच्या या आभारपत्राने कुणाला गहिवरून येणार नाही.
प्रभास सध्या ‘साहो’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. लवकरच प्रभास प्रभुदेवाच्या बॉलिवूडपटात कॅमिओ करताना दिसणार असल्याचेही कळतेय. या चित्रपटात तमन्ना भाटिया लीड रोलमध्ये आहे. तमन्नाच्या विनंतीवरूनच प्रभासने या चित्रपटासाठी होकार दिला आहे.