'ही' वेबसीरिज OTT वर नंबर १ वर करतेय ट्रेंड, क्लायमॅक्स तर डोकं फिरवणारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 13:24 IST2025-09-23T13:12:10+5:302025-09-23T13:24:45+5:30

वेबसीरिज ओटीटीवर प्रदर्शित होताच 'मस्ट वॉच' ठरली असून सध्या ती नंबर १ वर ट्रेंड करत आहे.

Bads Of Bollywood Review Aryan Khan 7 Episode Must Watch Series Trending No 1 On Netflix | 'ही' वेबसीरिज OTT वर नंबर १ वर करतेय ट्रेंड, क्लायमॅक्स तर डोकं फिरवणारा!

'ही' वेबसीरिज OTT वर नंबर १ वर करतेय ट्रेंड, क्लायमॅक्स तर डोकं फिरवणारा!

ओटीटीवर मनोरंजनाची रेलचेल असते. पण इतक्या सगळ्या चित्रपट आणि सीरिजमधून काय पाहावं आणि काय नाही, हे ठरवताना अनेकदा गोंधळ होतो.  पण आज आम्ही तुमच्यासाठी अशी एक धमाकेदार सीरिज घेऊन आलो आहोत, जीओटीटीवर प्रदर्शित होताच 'मस्ट वॉच' ठरली आहे.  प्रेक्षकांना ही सीरिज इतकी आवडली आहे की पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.

ड्रामा, ॲक्शन, कॉमेडी आणि रोमान्सनं परिपुर्ण असलेली ही ७ भागांची ही सीरिज प्रेक्षकांना पसंत पडली आहे. The Ba***ds of Bollywood असं या सीरिजचं नाव आहे. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याने या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे.  The Ba***ds of Bollywood ही सीरिज १९ सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज झाली असून भारतात पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.

The Ba***ds of Bollywood ला IMDb वर ७.७ ची रेटिंग मिळालं आहे. या सीरिजमध्ये ७ एपिसोड्स असून प्रत्येक एपिसोड ४० मिनिटांपेक्षा जास्त आहे. पण हे पाहताना तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही, कारण आर्यनने बॉलिवूडची ग्लॅमर जवळून दाखवलं आहे. त्यात एकाच फ्रेममध्ये अनेक कलाकारांना उभं केलं आहे.

अनेक मोठे स्टार्स  या सीरिजमध्ये आहेत. यामध्ये लक्ष्य लालवानी, अन्या सिंग, राघव जुयाल, बॉबी देओल, सेहर बंबा, मोना सिंग, राजद बेदी, गौतमी कपूर आणि मनोज पाहवा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय, शाहरुख खान आणि करण जोहर यांचाही खास सहभाग आहे. विशेष म्हणजे, या मालिकेत अनेक बॉलिवूड कलाकारांनी पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत हजेरी लावली आहे, ज्यात इमरान हाश्मी, रणबीर कपूर, अर्जुन कपूर, राजकुमार राव, दिशा पटानी, शनाया कपूर, सारा अली खान आणि इब्राहिम अली खान यांचा समावेश आहे.

Web Title: Bads Of Bollywood Review Aryan Khan 7 Episode Must Watch Series Trending No 1 On Netflix

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.